- ऋजुता लुकतुके
दोन महिन्यांच्या पितृत्वाच्या रजेनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने आयपीएलमध्ये (IPL 2024, Virat Kohli) आपला फॉर्म दाखवून दिला आहे. आतापर्यंत ८ सामन्यांत त्याने ६३ च्या सरासरीने ३७९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. २००८ मध्ये ही लीग सुरू झाली तेव्हापासून कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळतोय. आता एकाच संघाकडून २५० षटकार लगावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- Iraq Fired Rockets: इराककडून सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला)
रविवारच्या सामन्यात सलामीला येत त्याने ७ चेंडूंत १८ धावा केल्या. यात त्याने २ षटकार तसंच एक चौकार ठोकला. त्याचबरोबर बंगळुरूकडून (RCB) त्याचे अडीचशे षटकारही पूर्ण झाले. विशेष म्हणजे एकाच संघाकडून सर्वाधिक षटकार खेचण्याच्या यादीत त्याचेच दोन संघ सहकारी त्याच्या मागोमाग आहेत. ख्रिस गेलने (Chris Gayle) बंगळुरूसाठीच २३९ षटकार खेचले आहेत. तर एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर २३८ षटकार आहेत. (IPL 2024, Virat Kohli)
इतकंच नाही तर आयपीएलच्या इतिहासात २५० षटकारांचा टप्पा गाठणारा विराट एकूण चौथा आणि दुसरा भारतीय ठरला आहे. ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर सर्वाधिक ३५७ षटकार आहेत. तर रोहितच्या (rohit sharma) नावावर आहेत २७५ षटकार. तर डिव्हिलिअर्सच्या (de Villiers) नावावर २५१ षटकार आहेत. तर एकाच संघासाठी वेगवेगळ्या स्पर्धेत मिळून सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- Israel Iran Conflicts : क्षेपणास्त्र डागून इस्रायलचं विमान पाडलं, या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात?)
यापूर्वी तो ख्रिस गेलच्या नावावर होता. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग धरून गेलच्या नावावर २६३ षटकार होते. तो विक्रमही विराटने मोडला आहे. (IPL 2024, Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community