- ऋजुता लुकतुके
विराट कोहली (IPL 2024, Virat Kohli) फलंदाजीला उतरला की, नवीन विक्रम घडतात, हे समीकरण आता नवीन राहिलेलं नाही. या आयपीएलमध्येही त्याची बॅट तळपतेय. हंगामातील ५०० धावा त्याने पूर्ण केल्या आहेत. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यापूर्वी हा मापदंड ओलांडण्यासाठी त्याला ७० धावांची गरज होती. ४४ चेंडूंत ७० धावा करून त्याने हा टप्पा ओलांडलाही. आता एका हंगामात ५०० धावा करण्याची आयपीएलमधील ही त्याची सातवी खेप होती. या बाबतीत डेव्हिड वॉर्नरशी (David Warner) त्याने बरोबरी केली आहे. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- Pune: जलचर पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी पुण्यात नैसर्गिक अधिवास आणि पक्षीगृहे उभारणार)
या दोघांनंतर शिखऱ धवन (Shikhar Dhawan) आणि के एल राहुल यांनी अशी कामगिरी पाचदा केली आहे. या हंगामात ऑरेंज कॅपही विराटकडेच आहे. (IPL 2024, Virat Kohli)
A memorable chase from @RCBTweets ✨
A partnership of 1️⃣6️⃣6️⃣* between Virat Kohli & Will Jacks power them to 🔙 to 🔙 wins ❤️
Will their late surge help them qualify for the playoffs?🤔
Scorecard ▶️ https://t.co/SBLf0DonM7#TATAIPL | #GTvRCB pic.twitter.com/Tojk3eCgxw
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
या आयपीएलमध्ये विराटच्या नावावर १ शतक आणि ४ अर्धशतकं जमा आहेत. आणि त्याचा स्ट्राईकरेट १४४ धावांचा तर सरासरी ७१ धावांची आहे. विराटनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) साई सुदर्शन आहे. त्याच्या नावावर ४२८ धावा आहेत. तर संजू सॅमसन (३८५), के एल राहुल (३७८) आणि रिषभ पंत (३७१) हे पहिल्या पाचांत आहेत. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- IPL 2024, Virat Kohli : क्रिकेटपासून दूर असताना विराटने क्रिकेटसाठी ‘हे’ केलं)
आपल्या ७० धावांच्या खेळीदरम्यान विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना विराटने झळकावलेलं हे २४ वं अर्धशतक आहे. या बाबतीही त्याने शिखर धवनला (Shikhar Dhawan) मागे टाकलं आहे. शिखर धवनने (Shikhar Dhawan) ही कामगिरी २३ वेळा केली होती. या बाबतीत एक फलंदाज विराटच्या पुढे आहे तो म्हणजे डेव्हिड वॉर्नर (David Warner). त्याने धावांचा यशस्वी पाठलाग करताना तब्बल ३५ अर्धशतकं ठोकली आहेत. (IPL 2024, Virat Kohli)
रोहितचं अर्धशतक आणि विल जॅक्सने केलेल्या ४१ चेंडूंत १०० धावांच्या खेळीमुळे बंगळुरूने या हंगामात १० सामन्यांत आपला तिसरा विजय साकारला आहे. गुण तालिकेत सध्या बंगळुरुचा संघ दहाव्या स्थानावर आहे. (IPL 2024, Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community