- ऋजुता लुकतुके
विराट कोहली (IPL 2024, Virat Kohli) मैदानावर असतो तेव्हा तो आपल्यातील उत्साह आणि जिगर कायम ठेवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत असतो. त्याचवेळी तो आव्हान स्वीकारणारा आणि स्पर्धात्मकही असतो. प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही तो खिलाडू वृत्तीने आव्हान देतो. पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाचा रिली रसॉ धुवाधार फटकेबाजी करत होता तेव्हा षटकामागे १३ धावांचं बंगळुरूवे पंजाबला दिलेलं आव्हान आटोक्यातलं वाटत होतं. रसॉचा धडाकाच तसा होता. २७ चेंडूंत ६१ धावा केल्या होत्या. (IPL 2024, Virat Kohli)
अर्धशतक पूर्ण झालं तेव्हा रसॉने तोफ डागल्याचा अविर्भाव करून मैदानात तो आनंद साजरा केला होता. ती त्याची नेहमीची पद्धत आहे. तेव्हा त्याची फलंदाजी बंगळुरू संघासाठी डोकेदुखीही ठरली होती. पण, तो बाद झाल्यावर विराटने त्याचं सेलिब्रेशन त्याच्यावरच उलटवलं. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- IPL 2024 Virat Kohli : विराट कोहली ४ हंगामात ६०० च्या वर धावा करणारा दुसरा फलंदाज)
कर्ण शर्माच्या (Karan Sharma) फिरकीवर पहिल्या तीन चेंडूंवर चौकार आणि षटकार वसूल केल्यानंतर चौथा आणि पाचवा चेंडू डॉट बॉल पडला. अखेर सहाव्या चेंडूवर कर्णला त्याचा बळी मिळाला. विल जॅक्सने (Will Jacks) झेल घेण्यात कुचराई केली नाही. रसॉ बाद झाल्यावर मैदानावर घडलं विराट सेलिब्रेशन. (IPL 2024, Virat Kohli)
For Every Action There Is Equal And Opposite Reaction 💯💯💯
What A Electrifying RunOut⚡⚡⚡
KING KOHLI MANIA EVERYWHERE ON THE FIELD♥♥♥#RCBvPBKS #ViratKohli #PBKSvsRCB pic.twitter.com/xEB3YJtUxw
— 𝘚𝘸𝘦𝘵𝘩𝘢™ (@Swetha_little_) May 9, 2024
Same same but different! 😁😉
Who amongst #ViratKohli or #RileeRossouw did it better? 👀
📺 | #PBKSvRCB | LIVE NOW | #IPLOnStar pic.twitter.com/eQyhqbE46X
— Star Sports (@StarSportsIndia) May 9, 2024
बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा हा १२ सामन्यांत पाचवा विजय होता. १० गुणांसह ते आता अजूनही सातव्या स्थानावर आहेत. पण, विराट सारख्या अव्वल खेळाडूची जिगर आणि स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड त्याच्या मैदानातील वावरातून स्पष्ट दिसते. आपल्या खेळाडूचं चांगल्या कामगिरीसाठी तो हरप्रकारे कौतुक करताना दिसतो. शशांक सिंग सारख्या धोकादायक फलंदाजाला धावचीत करतानाही विराटने तीच जिगर दाखवली. अचूक फेकीने ३७ धावांवर त्याने शशांकला बाद केलं. स्वत: विराट कोहलीने या हंगामात १२ सामन्यांत ६३४ धावा करत ऑरेंज कॅप स्वत:कडे राखली आहे. (IPL 2024, Virat Kohli)
हेही पहा-