-
ऋजुता लुकतुके
चेन्नई विरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात डावखुरा तेज गोलंदाज यश दयालची कामगिरी उठून दिसली. ५५ धावांच्या खेळीसाठी कर्णधार फाफ दू प्लेसिसला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पण, त्यानेही तो लगेचच यशला समर्पित करून टाकला. याला कारण, शेवटच्या षटकांत डोकं शांत ठेवून यशने केलेली गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर धोनीने १०५ मीटर दूरवर षटकार मारलेला असताना यशने पुढच्या चेंडूवर धोनीला बाद केलं. इतकंच नाही तर दोन चेंडूंत ११ धावा हव्या असताना शेवटचे दोन चेंडू निर्घाव टाकले. (IPL 2024)
चेंडूच्या वेगात बदल करून फलंदाजाला गोंधळात पाडण्याचं कसब यश दयाल (Yash Dayal) शिकलाय. आणि या हंगामात त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ते उपयोगी पडतंय. चेन्नईला शेवटच्या षटकांत सरस धावगती राखण्यासाठी १७ धावा हव्या होत्या. आणि पहिलाच चेंडू धोनीने जवळ जवळ मैदानाबाहेर भिरकावून दिला. षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका बसला तर गोलंदाजावर चांगलंच दडपण येतं. आणि तो आधी मानसिक दृष्ट्या खचतो. आणि हीच रणनीती धोनीने वापरली.
(हेही वाचा – Mahadev Betting App प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक!)
पण, तो समोरच्या गोलंदाजाला जोखायला यावेळी कमी पडला. आणि यश दयालच्या (Yash Dayal) जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला विराट यशच्या मदतीला धावून आला. नव्याने व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत विराट ओरडून यशला काही सांगताना दिसतो.
विराट म्हणतो, ‘यॉर्कर टाकू नको. धिमा चेंडू टाक.’ आणि दयालने नेमकं तेच केल्यावर धोनी सीमारेषेवर झेल देऊन बसला.
Kohli to Dayal- “yorker nahi daal, slower ball daal”
Next ball- Dayal takes Ms Dhoni’s wicket! pic.twitter.com/8dc6VfFMMj
— akshat. (@StanVirat) May 20, 2024
(हेही वाचा – IPL 2024 RCB in Playoff : तळातून थेट बाद फेरीत पोहोचलेल्या बंगळुरू संघाविषयी खुद्द विराट कोहली काय म्हणतो?)
दयाल एवढ्यावरच थांबला नाही. धोनीला बाद केल्यावर शेवटच्या दोन चेंडंमध्ये चेन्नईला बाद फेरी गाठण्यासाठी १० धावा हव्या होत्या. आणि समोर होता जम बसलेला रवींद्र जाडेजा जो ४२ धावांवर नाबाद होता. पण, हे दोन्ही चेंडू दयालने निर्धाव टाकले. दयालने आपल्या ४ षटकांमध्ये ४२ धावा देत २ बळी मिळवले, यंदाच्या हंगामात १४ सामन्यांत दयालने १५ बळी मिळवले आहेत. (IPL 2024)
आणि बंगळुरूसाठी आणि खास करून कर्णधार फाफ दू प्लेसिससाठी तो भरवशाचा गोलंदाज ठरला आहे. वेगात केलेले बदल आणि अचूकता यामुळे बंगळुरू संघाच्या हंगामातील पुनरागमनात दयालने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community