- ऋजुता लुकतुके
आयपीएलमधील स्ट्राईक रेटवरून विराट कोहलीला (IPL 2024, Virat Kohli) एक तगडा पाठिराखा मिळाला आहे. ज्येष्ठ समालोचक, माजी कर्णधार आणि क्रिकेटचा जाणकार माजी खेळाडू रवी शास्त्रीने (Ravi Shastri) विराटला पाठिंबा व्यक्त केला आहे. विराटने या हंगामात केलेल्या ५०० धावांचं उलट त्याने कौतुकच केलं आहे. ‘दुसऱ्या बाजूला एकामागून एक विकेट पडत असताना कोहलीने नेमकं काय करावं? तो अशा संघात आहे, जिथे फक्त एक किंवा दोनच खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. अशावेळी कोहलीला दोष कसा देता येईल,’ असा सवालच रवी शास्त्री यांनी स्टेक डॉट कॉम या वेबसाईटला दिेलेल्या मुलाखतीत केला आहे. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- T20 World Cup Snub : रिंकू सिंगच्या गावकऱ्यांनी आणून ठेवले होते फटाके आणि मिठाई )
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्ध अलीकडेच कोहलीने खेळलेल्या खेळीचं शास्रीने कौतुक केलं आहे. कोहलीने या सामन्यात ४४ चेंडूंत ७० धावा केल्या. विल जॅक्सच्या (Will Jacks) ४१ चेंडूंत केलेल्या शतकामुळे बंगळुरूने हा सामना जिंकला. ‘विराटने सुरुवातीपसून डावाला आकार देण्याची भूमिका बजावली. त्याला जॅक्सची साथ मिळाल्यावर बंगळुरुने हा सामना जिंकला. प्रत्येक खेळाडूवर एक जबाबदारी असते. खेळात सातत्य ठेवणं ही त्याची वैयक्तिक जबाबदारी असते. या दोन्ही जबाबदाऱ्या कोहलीने निभावल्या आहेत,’ असं प्रशस्तीपत्रक रवी शास्त्रीने (Ravi Shastri) कोहलीला दिलं. (IPL 2024, Virat Kohli)
विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करतोय. ११ डावांत आतापर्यंत त्याने १४७ धावांच्या स्ट्राईकरेटने ५०० धावा केल्या आहेत. तर एकूण आयपीएलच्या इतिहासात त्याच्या नावावर सर्वाधिक ७,७९६ धावा जमा आहेत. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये विराटवर संघासाठी आवश्यक स्ट्राईकरेट न राखल्याबद्दल टीका होत आहे. त्याने राजस्थान संघाविरुद्ध शतकही ठोकलं. पण, ते ६९ चेंडूंत. आयपीएलच्या इतिहासातील हे सगळ्यात धिमं शतक ठरलं होतं. पण, कोहलीवर टीका होतेय, तसेच माजी खेळाडू त्याच्या मागे भक्कम उभे आहेत. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- Raj Thackeray: श्रीकांत शिंदेंसाठी मनसेने कंबर कसली, राज ठाकरेंची कल्याणमध्ये सभा)
भारतीय निवड समितीनेही त्याच्यावर विश्वास दाखवताना टी-२० विश्वचषकासाठी त्याची आघाडीच्या फळीत निवड केली आहे. (IPL 2024, Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community