-
ऋजुता लुकतुके
ख्रिस गेलला (Chris Gayle) आयपीएलमध्ये ‘युनिव्हर्स बॉस’ असं म्हणायचे. फलंदाजीत त्याची जरबच तशी होती. आयपीएलमध्ये २०११ ते २०१७ या कालावधीत तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाबरोबर होता. आणि यंदाच्या हंगामात ज्या पद्धतीने बंगळुरू संघाने ७ पराभवांनंतर सलग सहा सामने जिंकत मुसंडी मारली, संघाचा शेवटचा साखळी सामना बघायला गेल जातीनं हजर होता. चेन्नई विरुद्धचा सामना बंगळुरूने २४ धावांनी जिंकला आणि बाद फेरीत प्रवेशही केला. गेलने खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी थेट ड्रेसिंग रुम गाठली. आणि सगळ्यात आधी गेलने गळाभेट घेतली ती विराट कोहलीची. (Virat Kohli)
स्वत: गेल षटकार ठोकण्यासाठी प्रसिद्ध होता. विराटने गेलला पाहता क्षणी सुनावलं, ‘या हंगामात सर्वाधिक षटकार मी ठोकले आहेत.’ विराटने खरंच शनिवारपर्यंत ३७ षटकारांसह स्पर्धेत सर्वाधिक षटकारांच्या यादीतही मुसंडी मारली होती. (पुढे रविवारी अभिषेक शर्माने कोहलीचा विक्रम मोडून ४२ वर नेला.)
(हेही वाचा – Mahadev Betting App प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक!)
गेलला पाहताच विराट म्हणतो, ‘या हंगामात मी सर्वाधिक षटकार मारले आहेत.’
गेल – ‘किती?’
विराट – ‘३७’
असा हा दोघांमध्ये झालेला संवाद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटने चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध २९ चेंडूंत ४७ धावा केल्या. यात त्याने ४ उत्तुंग षटकार लगावले. त्यामुळे हंगामातील त्याची षटकारांची संख्या ३७ वर पोहोचली. १४ सामन्यांत ७०८ धावांसह विराट धावांच्या शर्यतीतही अव्वल आहे. आणि ऑरेंज कॅपही सध्या त्याच्या डोक्यावर आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : सूर्यकुमार यादव, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी केलं लोकसभेसाठी मतदान)
Chris Gayle and Virat Kohli in the RCB dressing room together – nostalgia max! 🥹
Virat jokingly asks Chris to come back to the #IPL – what do you think about it, 12th Man Army? 😉#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/Bj9HVFfVka
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 20, 2024
विराट या व्हीडिओत गेलशी आणखीही विषयांवर गप्पा मारताना दिसतो. इम्पॅक्ट खेळाडूवरूनही तो गेलची मस्करी करतो. ‘काका, पुढच्या हंगामापासून तू पुन्हा आमच्याबरोबर खेळायला लाग. इम्पॅक्ट खेळाडूचा नियम तुझ्यासाठीच बनलाय. फक्त फलंदाजी कर. तुला आता क्षेत्ररक्षण करायला नको,’ असं विराट गेलला म्हणतो. आणि गेलही त्याला मनमुराद दाद देतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ पैकी ७ सामने जिंकत गुण तालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. आता एलिमिनेटरच्या लढतीत त्यांची गाठ बुधवारी राजस्थान रॉयल्सशी पडेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community