- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या मागच्या आठवड्यात मयंक यादवची गोलंदाजीमुळे चर्चा झाली. तशीच फलंदाजीसाठी स्टार खेळाडू विराट कोहलीचीही (Virat Kohli) झाली. पण, विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोन सामने गमावल्यामुळे विराटला ट्रोलिंगही सहन करावं लागलं. शिवाय वयाची ३५ वर्ष ओलांडली असताना विराट कोहली टी-२० क्रिकेटसाठी योग्य आहे का असा काहीसा चर्चेचा सूरही दिसला. नेमकं काय घडलं ते पाहूया. (IPL 2024 Virat Kohli)
शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघादरम्यानच्या लढतीत बंगळुरूने पहिली फलंदाजी करत ३ बाद १८३ धावा केल्या. यात विराटचा (Virat Kohli) वाटा होता ७३ चेंडूंमध्ये ११३ धावा. आणि त्याचा स्ट्राईक रेट होता १५६.९४ चा. राजस्थान संघाने हे आव्हान १९.१ षटकांत पार केलं. आणि ते करताना राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने शतक झळकावलं ते ५७ चेंडूंत. विराटने आपलं शतक ६७ चेंडूत पूर्ण केलं. आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात मंद गतीने शतक पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्यामुळेच टीका सुरू झाली आहे की, विराट सातत्यपूर्ण खेळत असला तरी धावांचा वेग वाढवू शकत नाहीए. आणि राजस्थान विरुद्ध बंगळुरू संघाला २० ते ३० धावा कमी पडल्या. (IPL 2024 Virat Kohli)
विराटने सामन्यानंतर खेळपट्टीवर चेंडूंची उसळी आणि वेग बदलत होता, अशी प्रतिक्रिया दिली. ती ही काही जणांना रुचली नाहीए. माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने यावर आश्चर्य व्यक्त केलंय. माजी क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (Virat Kohli) टी-२० क्रिकेटमधील फलंदाजीच्या वेगावर सध्या दोन तटांमध्ये विभागले गेले आहेत. काहींना वाटतंय विराटने निवृत्त होऊन नवीन खेळाडूला जागा द्यावी. तर काहींना वाटतंय विराटने एकट्याने बंगळुरू संघाचा भार उचललाय. तो इतर फलंदाजांमध्ये विभागला गेला पाहिजे. सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी या बाबतीत विराटला पाठिंबा दर्शवला आहे. (IPL 2024 Virat Kohli)
(हेही वाचा – Allahabad High Court : हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘सप्तपदी’ अत्यावश्यक; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय)
विराटचा वाटा ३८ टक्के
सेहवागने विराटची बाजू घेतली असली तरी संघाला २०-३० धावा कमी पडल्या हे मान्य केलं. ‘विराट चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण, संघाला २० धावा तरी कमी पडल्या. एक बाजू विराटने लावून धरलेली असताना ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक किंवा लोमरोव्ह यांनी येऊन शेवटच्या षटकांत गती वाढवायला हवी होती. विराटची (Virat Kohli) भूमिका २० षटकं फलंदाजी करण्याची असेल तर त्याला दुसऱ्या बाजूने सहकार्य मिळायला हवं,’ असं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. आपल्या ११३ धावांच्या खेळीत विराटने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. पण, दुसऱ्या बाजूने फाफ दू प्लेसिसच्या ४४ धावांचा अपवाद सोडला तर त्याला कुणाची साथ मिळाली नाही. इतकंच नाही तर आतापर्यंत बंगळुरू संघाने केलेल्या एकूण धावांमध्ये एकट्या विराटचा वाटा ३८ टक्के आहे. (IPL 2024 Virat Kohli)
विराट (Virat Kohli) आणि फाफ दू प्लेसिसने बंगळुरू संघाला ११ षटकांत १२५ धावांची सलामी करून दिली होती. पण, त्यानंतर ग्रीन आणि मॅक्सवेल झटपट बाद झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंगळुरू संघाचा पराभव झाला. या हंगामात ५ सामन्यांपैकी ४ सामने बंगळुरूने गमावले आहेत. त्यामुळे संगासाठी काहीही मनासारखं होत नाहीए हे नक्की आहे. आणि विजयाची टक्केवारी अशीच राहिली तर विराट कोहलीवरील दडपण आणखी वाढणार आहे. (IPL 2024 Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community