![](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2024/05/New-Project-2024-05-04T212851.554-696x377.webp)
- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना शनिवारी बंगलुरूच्या चिन्नास्वामी मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघात एकमेकांचे मित्र असलेले शुभमन गिल आणि विराट कोहली आमने सामने होते. त्यामुळे विराटला भेटायला शुभमन थेट बंगळुरूच्या ड्रेसिंग रुममध्येच पोहोचला. (IPL 2024 Virat-Shubman Banter)
गुजरात टायटन्सने हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. आणि त्यात शुभमन आणि विराट एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. दोघांनी आधी हस्तांदोलन केलं. आणि मग विराटने गंमतीने शुभमनची थोडीशी टेर खेचली. ‘आता उगवलास सरावासाठी?’ असं विराट शुभमनला विचारताना दिसतो. (IPL 2024 Virat-Shubman Banter)
𝗦𝗵𝘂𝗯𝗥𝗮𝘁 reunion 💙❤️#AavaDe | #GTKarshe | #RCBvGT @ShubmanGill @imVkohli https://t.co/DUja4g8x5t pic.twitter.com/cVU2A0736c
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 3, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election : संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी दिग्गजांची फौज; शाहू महाराजांकडे मात्र मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष)
या व्हिडिओला गुजरात टायटन्सने मथळाही वेगळा दिला आहे. दोघांची नावं एकत्र करून ‘शुभराट यांची पुनर्भेट’ असं त्यांनी लिहिलं आहे. (IPL 2024 Virat-Shubman Banter)
एरवी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोघांनाही हा हंगाम विसरण्यासारखाच गेला आहे. बंगळुरू तर इतके दिवस गुणतालिकेत तळालाच आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ आठव्या स्थानावर. आणि दोन्ही संघांचं आव्हान जवळ जवळ संपल्यात जमा आहे. (IPL 2024 Virat-Shubman Banter)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community