- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) थोड्या विश्रांतीनंतर मुंबई इंडियन्स संघाच्या ताफ्यात शुक्रवारी दाखल झाला. तब्बल दोन वर्षांनी तो मुंबई फ्रँचाईजीच्या ड्रेसिंग रुममध्ये आल्यामुळे संघात उत्साहाचं वातावरण होतं. २०२३ चा अख्खा हंगाम पाठीवरील शस्त्रक्रियेमुळे तो खेळू शकला नव्हता. त्यामुळे मुंबई संघापासून तो दोन वर्षं दूर आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- PM Narendra Modi : भारत आणि भूतान यांच्यात सामंजस्य करारांची देवाणघेवाण; दोन्ही पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय बैठक)
२०१३ मध्ये बुमरा (Bumrah) मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) करारबद्ध झाला. आणि त्यानंतर मुंबईकडून १२० सामने खेळताना त्याने ७ च्या धावगतीने १४५ बळी मिळवले आहेत. तो संघात आल्यापासून त्याला लसिथ मलिंगाचा वारसदार मानलं जातं. आणि मुंबई संघाच्या पाच विजेतेपदांत त्याचा वाटाही मोठा असल्याचं संघ प्रशासनाने वेळोवेळी बोलून दाखवलं आहे. (IPL 2024)
मुंबई संघात त्याने पुनरागमन केल्यामुळे संघातील गोलंदाजीचा अनुभव आणि भेदकता दोन्ही वाढणार आहे. बुमरा संघात दाखल झाला तो क्षण मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचाईजीने सोशल मीडियावर टाकला आहे. आणि त्याला मथळाच दिलाय की, ‘व्हाय फिअर, व्हेन बुम इज हिअर?’ म्हणजेच बुमरा संघात आलेला असताना घाबरायचं कशाला? (IPL 2024)
(हेही वाचा- IPL 2024 : सलामीच्या सामन्यात चेन्नईची बंगळुरूवर ६ गडी राखून मात )
Why fear? 𝗕𝗢𝗢𝗠 is here 😎🔥#OneFamily #MumbaiIndians | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/eZD18VOxIO
— Mumbai Indians (@mipaltan) March 22, 2024
मुंबईचा संघ आपला पहिला सामना रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळणार आहे. अर्थातच, पहिला सामना जिंकून यंदाच्या आयपीएल मोहिमेचा श्रीगणेशा विजयाने करण्याचा मुंबईचा प्रयत्न असणार आहे. दुसरं म्हणजे आधीच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विजयाचा वारू गुजरात टायटन्सनेच (Gujarat Titans) क्वालिफायर फेरीत अडवला होता. त्याचा बदला घेण्याची संधीही मुंबईसमोर आहे. (IPL 2024)
(हेही वाचा- Mazgaon Tadwadi ताडवाडीतील त्या कुटुंबांची नरकयातना संपवा, पुनर्विकास होईपर्यंत माझगावमध्ये पर्यायी पुनर्वसन करा)
पण, मुंबईचा संघ गेल्या हंगामात बाद फेरीत पोहोचला होता. आणि गुजरात बरोबरच्या पराभवानंतर त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्या पराभवामुळे मुंबईची सहाव्या विजेतेपदाच्या दिशेनं सुरू असलेली घोडदौड थांबली होती. (IPL 2024)