IPL 2024 : बीसीसीआयची खप्पामर्जी असलेल्या इशान किशनशी जेव्हा जय शाह गप्पा मारतात…

IPL 2024 : मुंबईचा पहिला सामना अहमदाबादला झाला तेव्हा बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते 

179
IPL 2024 : बीसीसीआयची खप्पामर्जी असलेल्या इशान किशनशी जेव्हा जय शाह गप्पा मारतात…
IPL 2024 : बीसीसीआयची खप्पामर्जी असलेल्या इशान किशनशी जेव्हा जय शाह गप्पा मारतात…
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयने मध्यवर्ती कराराच्या यादीतून वगळलेला खेळाडू इशान किशन (Ishan Kishan) रविवारी उशिरा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याशी बराच वेळ गप्पा मारताना दिसला. रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होता. आणि या सामन्यानंतर दोघांची भेट झाली. (IPL 2024)

(हेही वाचा- Arvind Kejriwal यांचा ‘तो’ आदेश निघाला खोटा; भाजपाची आपच्या मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी)

झारखंडचा २५ वर्षीय खेळाडू डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडून भारतात परतला होता. तेव्हा त्याने मानसिक थकव्याचं कारण दिलं होतं. आणि त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणंही त्याने टाळलं आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी जाहीरपणे रणजी सामने खेळण्याचा सल्ला दिलेला असतानाही इशान झारखंडच्या सामन्यांपासून दूर राहिला. उलट बडोद्यात तो मुंबई इंडियन्सच्या सराव केंद्रात कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर सराव करत होता. (IPL 2024)

या वागण्यामुळे इशानने अखेर बीसीसीआयची नाराजी ओढवून घेतली. आणि गेल्या महिन्यात बीसीसीआयने खेळाडूंबरोबरच्या मध्यवर्ती करारांचं नुतनीकरण केलं, त्यातून इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वगळलं होतं. मागचे ४ महिने इशान स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता. आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो डी वाय पाटील चषक स्पर्धा मात्र खेळला. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. (IPL 2024)

(हेही वाचा- IPL 2024 Schedule : आयपीएलच्या २०२४ च्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक; सामने कुठे, कधी होणार?)

पण, सामन्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह त्याच्याशी नेहमीसारख्या गप्पा मारताना दिसले. त्यांनी इशानला टाळलं तर नाहीच. शिवाय थांबून त्याच्याशी हस्तांदोलन केलं. आणि हास्यविनोदही केले. त्यामुळे बीसीसीआयची नाराजी असली तरी संघटनेचे सचिव इशानशी मोकळेपणाने बोलताना दिसल्यामुळे इशान किशनसाठी हे सकारात्मक मानलं जात आहे. अर्थात, पुन्हा टी-२० भारतीय संघात स्थान मिळवणं इशानसाठी कठीणच जाणार आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- K. Kavitha: के. कविता यांना ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी)

रिषभ पंत मैदानात परतलाय. के एल राहुलने यष्टीरक्षण आणि फलंदाजी दोन्हीसाठी तयार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. तर जितेन शर्मा आणि ध्रुव जुरेलही या जागेसाठी स्पर्धेत आहेत. त्यामुळे इशानला टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळण्याची शक्यात थोडी कमीच आहे. (IPL 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.