- ऋजुता लुकतुके
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा हा तिसरा आयपीएल हंगाम आहे. आणि यात त्यांनी पहिल्यांदा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा पराभव केला. घरच्या मैदानावर झालेल्या या लढतीत आधी लखनौ संघाने २० षटकांत ५ बाद १६३ धावा केल्या होत्या. पण, यश ठाकूरच्या गोलंदाजीमुळे ही धावसंख्याही पुरेशी ठरली. कारण, गुजरातचा संघ १९व्या षटकांतच १३० धावांवर सर्वबाद झाला. आणि ही वेळ त्यांच्यावर आणली ती ५ बळी टिपणाऱ्या यश ठाकूरने (Yash Thakur). या हंगामात डावांत पाच बळी टिपण्याची कामगिरी पहिल्यांदा घडली आहे. (IPL 2024, Yash Thakur)
त्याचबरोबर यश ठाकूर आता पर्पल कॅपच्या शर्यतीतही दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत या हंगामात एकूण १०.५ षटकं टाकताना १११ धावांमध्ये ६ बळी घेतले आहेत. (IPL 2024, Yash Thakur)
For his magnificent 5️⃣ wicket haul, Yash Thakur becomes the Player of the Match in the #LSGvGT clash 🏆
Scorecard ▶️ https://t.co/P0VeEL9OOV#TATAIPL pic.twitter.com/CtA3SxgYRu
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
खरंतर सामना लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा आहे म्हटल्यावर सगळ्यांचं लक्ष तेज गोलंदाज मयंक यादववर होतं. मयंक भारताचा सगळ्यात वेगवान गोलंदाज आहे. आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर मागच्या दोन सामन्यांत तोच सामनावीर ठरला होता. गुजरात विरुद्ध मात्र त्याने डावातील चौथं षटक टाकलं. आणि यात शुभमन गिलने (Shubman Gill) ३ चौकार वसूल केले. त्यामुळे कर्णधार राहुलला त्याला हटवावं लागलं. आणि थोडं लवकर चेंडू यश ठाकूरकडे सोपवावा लागला. कारण, पहिल्या ५ षटकांतच गुजरात संघाने ४७ धावांची सलामी दिलेली होती. (IPL 2024, Yash Thakur)
(हेही वाचा – IPL 2024, MI vs DC : रोमारिओ शेफर्डने शेवटच्या षटकात ३२ धावा कशा काढल्या?)
यश ठाकूरने आतापर्यंत मिळवले इतके बळी
पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात यशने सगळ्यात आधी शुभमन गिलला १९ धावांवर बाद केलं. त्यानंतर यशच्या हातात चेंडू आला तो थेट पंधराव्या षटकांत आणि त्याने लागोपाठच्या षटकांमध्ये विजय शेखर आणि रशिद खान यांना बाद केलं. यामुळे सामना गुजरातच्या हातातून निसटला. आणि आपल्या तिसऱ्या षटकांत राहुल टेवाटिया आणि नूर अहमद यांना बाद करत त्याने पाचवा बळीही मिळवला. लखनौ संघाचा हा तिसरा विजय आहे. आणि विशेष म्हणजे तीनही विजयात सामनावीर एखादा तेज गोलंदाजच ठरला आहे. (IPL 2024, Yash Thakur)
यश ठाकूरचा जन्म १९९८ मध्ये कोलकाता इथं झाला आहे. आणि तो देशांतर्गत क्रिकेट विदर्भासाठी खेळतो. भारताकडून खेळलेला तेज गोलंदाज उमेश यादवचं मार्गदर्शन विदर्भ संघात त्याला मिळालं आहे. देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये यश ठाकूरने आतापर्यंत ६९ बळी मिळवले आहेत. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६७ बळी आहेत. (IPL 2024, Yash Thakur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community