- ऋजुता लुकतुके
राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहलने (IPL 2024, Yuzvendra Chahal) मंगळवारी टी-२० क्रिकेटमध्ये ३५० बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मागची काही वर्षं युजवेंद्र टी-२० क्रिकेटमध्ये लक्षणीय कामगिरी करत आहे. राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळताना या हंगामातही पर्पल कॅपसाठी तो प्रमुख दावेदार आहे. त्यातच आता त्याने हा मापदंड सर केला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतचा (Rishabh Pant) बळी टिपून युजवेंद्रने ३५० बळी पूर्ण केले. (IPL 2024, Yuzvendra Chahal)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : मायावतींनी राष्ट्रीय समन्वयक पदावरून आकाश आनंदला हटविले)
युजवेंद्र चहलचा लेग-स्पिन भल्या भल्या फलंदाजांना बुचकाळ्यात टाकतो. भारतीय संघ तसंच आयपीएलमध्येही त्याने सामना जिंकून देणारी कामगिरी केली आहे. त्याच्या गोलंदाजीची हीच जादू दिल्लीविरुद्ध बघायला मिळाली. शेवटच्या क्षणी वळलेला चहलचा हा चेंडू खेळताना रिषभ पंतचा (Rishabh Pant) तोल गेला. त्याने चेंडू उंच टोलवला खरा. पण, ट्रेंट बोल्टने झेल टिपण्यात कुचराई केली नाही. (IPL 2024, Yuzvendra Chahal)
Yuzi gets his 3️⃣5️⃣0️⃣th T20 wicket – Most by an Indian 🙌#TATAIPL #DCvRR #IPLonJioCinema #YuzvendraChahal pic.twitter.com/yExNoj3ddE
— JioCinema (@JioCinema) May 7, 2024
चहल २०१६ ते २०२३ मध्ये भारतासाठी खेळलेला आहे. आताही आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात त्याची निवड झाली आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत त्याने ९६ बळी मिळवले आहेत. त्याच्या खालोखाल भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) ९० बळी टिपले आहेत. तर जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) ७४ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. यंदाचं आयपीएल युजवेंद्र चहलसाठी विक्रमांनी भरलेलं ठरलं आहे. अलीकडेच आयपीएलमध्ये दोनशे बळी त्याने पूर्ण केले होते. ही कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. (IPL 2024, Yuzvendra Chahal)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community