-
ऋजुता लुकतुके
भारताचा कसोटी तेज गोलंदाज आकाशदीप सिंग आता पाठीच्या दुखापतीतून सावरला आहे. तो लवकरच लखनौ सुपरजायंट्स संघात दाखल होणार आहे. शुक्रवारचा मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना तो खेळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना बोर्डर गावस्कर चषकातील पाचव्या सिडनी कसोटी दरम्यान आकाशदीपला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. लखनौ संघाने यंदा मेगा लिलावात त्याला विकत घेतलं आहे. पण, तो या हंगामात एकही सामना अद्याप खेळलेला नाही. गेल्या हंगामातील टी-२० सामना हा त्याचा शेवटचा स्पर्धात्मक टी-२० सामना आहे. (IPL 2025, Akashdeep)
(हेही वाचा – Muzaffarnagar मधील मुस्लिम कुटुंबातील १० जणांची हिंदू धर्मांत घरवापसी)
Akash Deep strengthens Lucknow Super Giants for the rest of IPL 2025! 🔵🔥
📷: Lucknow Super Giants #Cricket #LSG #IPL2025 #AkashDeep #cricketlovers #onecricket @IPL pic.twitter.com/ThvVfZeS1M— onecricketcom (@onecricketcom) April 3, 2025
यापूर्वी तो बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सशी करारबद्ध होता आणि गेल्या हंगामात बंगळुरूकडून तो एकमेव सामना खेळला होता. एकंदरीत २०२२ पासून तो ८ सामने खेळला आहे आणि यात त्याने ७ बळी मिळवले आहेत. लखनौ फ्रँचाईजीला हंगामाच्या सुरुवातीपासून दुखापतीशी झगडावं लागलं आहे. हंगामाच्या सुरुवातीला मोहसीन खान दुखापतीमुळे खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. त्यामुळे फ्रँचाईजीने त्याच्या ऐवजी ऐनवेळी शार्दूल ठाकूरला करारबद्ध केलं. तर फ्रँचाईजीचा तरुण तेज गोलंदाज मयंक यादवही अजून दुखापतीतून सावरलेला नाही. बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत तो उपचार घेत आहे आणि फ्रॅक्चर झालेलं असतानाच त्याच्या पायाचं बोटही दुखावलं आहे. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरायला वेळ लागणार आहे. संघात असं वातावरण असताना आकाशदीप पुनरागमन करत असल्यामुळे लखनौ संघाला चांगला फायदा होणार आहे. (IPL 2025, Akashdeep)
सध्या लखनौ संघात शार्दूल ठाकूर, आवेश खान हे तेज गोलंदाज सध्या खेळतायत. लखनौ संघाने या हंगामात ३ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. आकाशदीपने आतापर्यंत ४२ टी-२० सामन्यांत ४९ बळी मिळवले आहेत. आताच्या मेगा लिलावात लखनौ फ्रँचाईजीने आकाशदीपला ८ कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. (IPL 2025, Akashdeep)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community