-
ऋजुता लुकतुके
आयपीएल लीगने टी-२० क्रिकेटमध्ये मोठी क्रांती केली आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-२० (International T20) मध्येही आयपीएलचा प्रभाव वेळोवेळी जाणवला आहे. क्रिकेटला नवीन खेळाडू देणं असो किंवा क्रिकेटमधील बदल टिपणं असो, यात आयपीएलची भूमिका मोठी आणि महत्त्वाची आहे. नियमांच्या बाबतीतही आयपीएलने आणलेला स्ट्रॅटेजिक टाईमआऊट (Strategic timeout) आणि इम्पॅक्ट खेळाडूचा (impact player) नियम आंतरराष्ट्रीय टी-२० नेही स्वीकारला आहे. आता आयपीएलचा अठरावा हंगाम सुरू होत आहे. त्यापूर्वी यंदाच्या हंगामासाठीच्या नियमांना आयपीएल प्रशासनाने मूर्त रुप दिलं आहे. कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांच्या बैठकीत हे नियम संघांना समजावून सांगण्यात आले आहेत. (IPL 2025)
यात काही नियमांमध्ये बदल झालाय. तर काही जुने नियम तसेच ठेवण्यात आले आहेत. चेंडूची लकाकी कायम राहावी यासाठी खास करून तेज गोलंदाज चेंडूला थुंकी लावतात. पण, कोरोना काळात ही पद्धत बंद करण्यात आली. आता खेळाडूंना थुंकी लावण्यासाठी पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. तर इम्पॅक्ट खेळाडूचा (impact player) नियम कायम ठेवण्यात आला आहे. नियमांमध्ये काय बदल झालेत किंवा कोणते नियम कायम आहेत हे जाणून घेऊया. (IPL 2025)
(हेही वाचा – RSS headquarters : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवादी रईस शेखचा जामीन अर्ज फेटाळला)
गोलंदाज आता चेंडूला थुंकी किंवा लाळ लावू शकणार आहेत. कोव्हिडच्या काळात आरोग्यविषयक सुरक्षेचा नियम म्हणून याची सुरुवात झाली होती. पण, खेळाडूंची, खास करून तेज गोलंदाजांची चेंडूची लकाकी कायम ठेवण्यासाठी हा नियम बदलण्याची मागणी होती. त्यानुसार, आता या हंगामात चेंडूला थुंकी किवा लाळ लावता येणार आहे.
सामन्यात दुसरा नवीन चेंडू वापरण्याविषयी नियमांत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. आयपीएलचे (IPL 2025) सामने दिवस-रात्र चालणारे असल्यामुळे रात्रीच्या वेळी दव पडतं. आणि गोलंदाजांना चेंडूवर नीट पकड बसवण्यात अडचणी येतात. त्यामुळे आयपीएलचे (IPL 2025) सामने हे पूर्णपणे फलंदाजांना धार्जिणे होत चालले होते. पण, आता अकराव्या षटकानंतर पंच चेंडूची पाहणी करणार आहेत. आणि चेंडू दवामुळे खराब झाला असेल तर दुसरा नवीन चेंडू गोलंदाजांना देण्याचे अधिकार पंचांना असतील.
आधीच्याच हंगामात सुरू केलेला इम्पॅक्ट खेळाडूचा (impact player) नियम या हंगामातही कायम असेल. सामना सुरू असताना कुठल्याही क्षणी संघांना एक खेळाडू बदलता येईल. अननुभवी आणि युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, यासाठी हा नियम आणला आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणेच आयपीएलमध्येही (IPL 2025) आता खेळाडूंच्या उंचीची नोंद करून ठेवण्यात आली आहे. आणि त्यानुसार, उंचीमुळे वाईड दिले जातील. तसंच ऑफ-साईड वाईडसाठी आता डीआरएसचा (DRS) वापर करता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community