IPL 2025, Ashwini Kumar : पदार्पणात ४ बळी घेणारा मुंबईचा अश्विनी कुमार कोण आहे?

कोलकात्या विरुद्ध पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवरच त्याने बळी मिळवला.

107
Ashwani Kumar : अश्वनी कुमारने नोकरीची संधी सोडून जेव्हा क्रिकेट निवडलं
Ashwani Kumar : अश्वनी कुमारने नोकरीची संधी सोडून जेव्हा क्रिकेट निवडलं
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा डावखुरा तेज गोलंदाज अश्विनी कुमारसाठी (Ashwini Kumar) त्याचं आयपीएल पदार्पण केवळ स्वप्नवत असंच ठरलं. आयपीएलमधील पहिल्याच चेंडूवर त्याने कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बाद केलं. आणि पुढे जाऊन डावात ४ बळी मिळवले. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून कोलकाताला पहिली फलंदाजी दिली. आणि चौथ्याच षटकांत त्याने चेंडू २३ वर्षीय अश्विनी कुमारच्या (Ashwini Kumar) हातात ठेवला. कोलकाताची अवस्था आधीच २ बाद २५ अशी बिकट असताना रहाणेही ११ धावांवर बाद झाला. थर्ड मॅनवर तिलक वर्माने (Tilak Varma) हा झेल बेमालून पकडला.

Ashwani Kumar with Head Coach Mahela Jayawardene at a practice session

विशेष म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी यापूर्वी आणखी तीन गोलंदाजांनी अशी कामगिरी केलेली आहे. अली मुर्तझा, अलझारी जोसेफ आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला आहे. तिलक वर्माने (Tilak Varma) हा झेल पकडलाही सुरेख. सुरुवातीला चेंडू त्याच्या हातातून निसटला होता. पण, नंतर त्याने तो पकडला.

(हेही वाचा – औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यकच; संघाचे ज्येष्ठ नेते Bhaiyyaji Joshi यांचे विधान)

अश्विनी एवढ्यावर थांबला नाही. पुढे त्याने रिंकू सिंग (Rinku Singh), मनीष पांडे (Manish Pandey) आणि आंद्रे रसेल (Andre Russell) असे आणखी तीन महत्त्वाचे बळी मिळवले. कोलकात्याची मधली फळी त्याने एकहाती कापून काढली. आपल्या ३ षटकांमध्ये २४ धावा देत त्याने ४ बळी मिळवले. त्याच्या भेदक गोलंदाजीनंतर कोलकाताचा संघ १६ षटकांत १०१ धावा करून सर्वबाद झाला. अश्विनी कुमार (Ashwini Kumar) चंदिगडमधील क्रिकेटचं केंद्र असलेल्या मोहाली उपनगरातून येतो. पंजाबकडून तो टी-२० आणि काही प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. फसवा बाऊन्सर हे त्याचं मुख्य अस्त्र आहे. मुंबई इंडियन्सनी त्याला आपल्या ताफ्यात घेतल्यानंतर त्याच्या पदार्पणाकडे सगळेच लक्ष ठेवून होते.

Ashwani Kumar struck against KKR at home on debut with his bowling figures of 4 for 24 scaled

(हेही वाचा – Mahad एमआयडीसी बांगलादेशींसह नक्षलवाद्यांचे बनले आश्रयस्थान?)

गोलंदाजीच्या वेगात सफाईने बदल करण्यासाठीही अश्विनी ओळखला जातो. शेर ए पंजाब स्पर्धेत गेल्या हंगामात त्याने चांगली कामगिरी केली होती. तसंच डावाच्या अंतिम षटकांमध्ये अचूक गोलंदाजी करण्याच्या त्याच्या क्षमतेचं कौतुक झालं होतं. ‘पहिलाच सामना असल्यामुळे दडपण होतं. आणि सामन्यापूर्वी मला जेवणही गेलं नाही. फक्त एक केळं खाऊन मी मैदानात उतरलो. पण, हार्दिक भाई आणि इतर खेळाडूंनी प्रोत्साहन दिलं. हार्दिकने आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. आणि पहिला बळी त्यावरच मिळाला,’ असं अश्विनीने बोलून दाखवलं. आयपीएलमध्ये पदार्पणात ४ बळी घेणारा अश्विनी कुमार (Ashwini Kumar) हा पहिला भारतीय गोलंदाज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.