IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

के एल राहुलच्या वर अक्षरच्या नावाला फ्रँचाईजीने पसंती दिली आहे.

36
IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
  • ऋजुता लुकतुके

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलवर (Axar Patel) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुक्रवारी ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. त्यामुळे आयपीएलच्या (IPL 2025) दहाही संघांचे कर्णधार आता ठरले आहेत. आताच्या चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघात अक्षर होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्यावर्षी ऋषभ पंत (Rishabh Pant) दिल्लीचा कर्णधार असताना संघाची कामगिरी खराब झाली होती. फ्रँचाईजी मालकांचे कामगिरीवरून ऋषभ पंतशी वादही झाले होते. त्यानंतर आता पंतने फ्रँचाईजी सोडली आहे. त्याच्या जागी अक्षर पटेल (Axar Patel) संघाचा कर्णधार झाला आहे.

३१ वर्षीय अक्षर पटेल (Axar Patel) १५० आयपीएल (IPL 2025) सामने आतापर्यंत खेळला आहे. आणि यात त्याने १,६५३ धावा करताना १३२ धावांचा स्ट्राईकरेट राखला आहे. तर त्याच्या नावावर १३२ बळीही आहेत. दिल्लीकडून तो ८२ सामने खेळला आहे. यात त्याने ९६७ धावा करताना ६२ बळी मिळवले आहेत.

(हेही वाचा – SSP Salary Per Month : पोलिस दलात एसएसपी ला किती वेतन दिलं जातं? ठाऊक आहे का तुम्हाला?)

(हेही वाचा – Milk : दूध दरात होणार दोन रुपयांनी वाढ; कधीपासून होणार दरवाढ?)

२०१९ पासून मागचे ६ हंगाम अक्षर (Axar Patel) दिल्ली कॅपिटल्सबरोबर (Delhi Capitals) आहे. यात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करतानाच भारतीय टी-२० आणि एकदिवसीय संघातही मजल मारली आहे. अक्षरने (Axar Patel) अजूनही आयपीएलमध्ये (IPL 2025) नेतृत्व केलेलं नाही. पण, या लीगमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो यशस्वी खेळाडू म्हणून ओळखला जातो. ‘दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळत असताना मी माणूस म्हणून आणि क्रिकेटपटू म्हणूनही प्रगल्भ झालो आहे. त्यामुळे कप्तानात्या भूमिकेसाठी मी तयार आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. मेगा लिलावात एक चांगला संघ घडवण्यात आमचे प्रशिक्षक यशस्वी झाले आहेत. आता आम्हाला करंडकाची आस आहे,’ असं अक्षर (Axar Patel) कर्णधार म्हणून झालेल्या नियुक्तीनंतर म्हणाला आहे.

संघात के एल राहुल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि मिचेल स्टार्क हे संघातील मुख्य खेळाडू आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ आपले पहिले दोन सामने विशाखापट्ठणम इथं खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.