IPL 2025, Bat Check : ‘पुढेही हेच होत राहणार,’ सामना थांबवून बॅट तपासण्यावर बीसीसीआयची स्पष्टोक्ती

IPL 2025, Bat Check : कोलकात्याच्या दोन फलंदाजांना चाचणीत फेल झाल्यामुळे बॅट बदलाव्या लागल्या. 

71
IPL 2025, Bat Check : ‘पुढेही हेच होत राहणार,’ सामना थांबवून बॅट तपासण्यावर बीसीसीआयची स्पष्टोक्ती
  • ऋजुता लुकतुके

प्रसंगी खेळ थांबवून नाहीतर डाव सुरू होण्यापूर्वी मैदानावरील पंच अचानक करत असलेल्या बॅट तपासणीची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सध्या रंगली आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यातही पंचांनी अगदी खेळ थांबवून तीन फलंदाजांची बॅट तपासून पाहिली. या तीनही वेळा बॅट बॅटगेजमधून आरपार गेली. त्यानंतर सोमवारी कोलकाता संघाचे दोन खेळाडू सुनील नरेन आणि एनरिच नॉर्किए यांना मात्र ही बॅटच्या आकाराची चाचणी उत्तीर्ण करता आली नाही. मग दोघांनाही बॅट बदलावी लागली. आयपीएलच्या नियमावलीप्रमाणे बॅटच्या वजनावर आयपीएलचं नियंत्रण नाही. ते कितीही असू शकतं. पण, बॅटची उंची आणि तिचा आकार यासाठी काही नियम आहेत. उंचीच्या बाबतीत हँडल मुख्य बॅटपेक्षा मोठं असता कामा नये. बॅटची जाडी, तळ तसंच कड यांचं मापही आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आयपीएलच्याही नियमावलीत देण्यात आलं आहे. त्या आकाराचा एक साचा पंचांकडे देण्यात आला आहे. यालाच बॅटगेज असं म्हणतात. (IPL 2025, Bat Check)

आयपीएलमध्ये पंच कधीही फलंदाजांची बॅट तपासून पाहू शकतात. डाव सुरू होण्यापूर्वी किंवा खेळ सुरू असताना तो थांबवून पंच बॅट तपासून पाहू शकतात. एखाद्या फलंदाजाला बॅटची जाडी किंवा आकारामुळे एखादा फटाक खेळणं विशेष सोपं जाऊ नये, सगळ्यांची बॅट आकाराने सारखीच असावी यासाठी हा नियम करण्यात आला आहे. पूर्वी आयपीएलमध्ये डाव सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंची बॅट ड्रेसिंग रुममध्ये तपासली जात होती. आता ती मैदनातही तपासण्यीच परवानगी आयपीएलमध्ये देण्यात आली आहे. (IPL 2025, Bat Check)

(हेही वाचा – हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही; Raj Thackeray यांची भूमिका)

याच नियमावर आयपीएलचे कार्यकारी अधिकारी अरुण धुमाळ यांनी आता अधिकृतपणे भाष्य केलं आहे. ‘पुढे जाऊन हीच पद्धत कायम राहील. बॅट तपासण्याचं प्रमाणही वाढेल,’ असं ते म्हणाले. ‘खेळ प्रामाणिक आणि नि:पक्ष असला पाहिजे. खेळण्यासाठी समान संधी आणि समान वातावरण असलं पाहिजे. ड्रेसिंग रुममध्ये बॅट तपासल्या तर त्यानंतर खेळाडू पुन्हा बॅट बदलणार नाहीत कशावरून? यासाठी बीसीसीआय आणि आयपीएलने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही पद्धतच इथून पुढे सुरू राहील,’ असं धुमाळ यांनी निक्षून सांगितलं. (IPL 2025, Bat Check)

आयपीएलमध्ये सर्रास २० षटकांत २०० पेक्षा जास्त धावा होतात. त्यामुळे क्रिकेटचा गाभा असलेलं बॅट आणि चेंडूंतील द्वंद्व बघायलाच मिळत नाही. अशावेळी आयपीएल त्यासाठीच प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं धुमाळ यांनी सांगितलं. ‘वजनाने जास्त बॅट हा एक मुद्दा आहेच. शिवाय हल्ली फलंदाज बॅटच्या तळाकडून फटका खेळतात. तिथेच चेंडू बॅटवर बसतो. तो भाग वजनदार असेल तर फटका जोराने लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही बॅट तपासणी सुरू झाली आहे. आम्ही यात थोडा फरक करून सामना सुरू असतानाही बॅट तपासणी करत आहोत,’ असं धुमाळ म्हणाले. अर्थात, आयपीएलमध्ये अजून बॅट चाचणीत नापास झाल्यास संघाचे गुण कापले जात नाहीत. फक्त फलंदाजास बॅट बदलायला सांगितलं जातं. (IPL 2025, Bat Check)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.