-
ऋजुता लुकतुके
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा मुख्य तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता तो आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी तेज गोलंदाज ठरला आहे. गुजरातविरुद्ध त्याने २३ धावांत एक बळी मिळवला. या दरम्यान आयपीएलमध्ये १८३ बळीही त्याने पूर्ण केले. आता तो आणि वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो या दोघांनी आयपीएलमध्ये १८३ बळी मिळवले आहेत. ब्राव्होनं १६१ सामन्यांत ही मजल मारली होती. तर भुवनेश्वरने त्यासाठी १७८ सामने घेतले. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम आजही यजुवेंद्र चहलच्या नावावर आहे. त्याने २०६ बळी घेतले आहेत. तर पियुष चावलाच्या नावावर १९२ बळी आहेत. (IPL 2025, Bhuvneshwar Kumar)
भुवनेश्वर कुमारला ‘स्विंग गोलंदाजीचा बादशाह,’ म्हटलं जातं. त्याने गुजरातविरुद्ध फक्त षटकामागे ५.८ च्या सरासरीने धावा देत एक बळीही घेतला. त्याने सुरुवातीलाच धोकादायक वाटणाऱ्या शुभमन गिलला बाद करत बंगळुरूला ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. पण, ही कामगिरी बंगळुरूला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसी नव्हती. (IPL 2025, Bhuvneshwar Kumar)
(हेही वाचा – Nanded Accident : १५ वर्षाच्या मुलाच्या हाती दिलं ट्रॅक्टरचं स्टेअरिंग ; विहिरीत कोसळून ८ शेतमजुरांचा मृत्यू)
Most wickets by a pacer in IPL History:
Bhuvneshwar Kumar – 183*
Dwayne Bravo – 183
– BHUVI, WHAT A LEGEND. 🙇 pic.twitter.com/zTcpAPMIkf
— Tanuj (@ImTanujSingh) April 2, 2025
बंगळुरूतील चिन्नास्वामी मैदानावर गुजरात टायटन्सनी बंगळुरूविरुद्ध सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवलं. गिल लवकर बाद झाला असला तरी त्यानंतर साई सुदर्शन, जोस बटलर आणि शरफन रुदरफोर्ड यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत बंगळुरूचं १७० धावांचं आव्हान १८ व्या षटकातच पार केलं. भुवनेश्वरने गिलला बाद केल्यानंतर सुदर्शन आणि बटलर यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७५ धावांची मजबूत भागिदारी रचली. तिथेच गुजरातचं सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित झालं. (IPL 2025, Bhuvneshwar Kumar)
बंगळुरूने आधीचे दोनही सामने जिंकून गुणतालिकेत आघाडी घेतली होती. पण, या सामन्यातील पराभवानंतर संघ आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भुवनेश्वर कुमारने मात्र एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्येही तो आता चौथ्या स्थानावर आहे. (IPL 2025, Bhuvneshwar Kumar)
यजुवेंद्र चहल – २०६
पियुष चावला – १९२
ड्ववेन ब्राव्हो – १८३
भुवनेश्वर कुमार – १८३
आर अश्विन – १८३
सुनील नरेन – १८३
हेही पहा –
Join Our WhatsApp Community