
-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघात शेवटच्या क्षणी भरती झालेला अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) आयपीएल (IPL 2025) सामन्यांमध्ये गोलंदाजांनाही समान संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मनोरंजनासाठी काही गोष्टी आवश्यक असल्या, तरी मोठ्या धावसंख्येच्या खेळपट्टया बनवण्याचा अट्टाहास सोडावा आणि इम्पॅक्ट खेळाडूचा नियमही बदलावा अशी शार्दूलची विनंती आहे. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळेल, असं त्याला वाटतं.
आयपीएलमध्ये (IPL 2025) आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यांपैकी १० सामन्यांमध्ये एका डावांत २०० पेक्षा घावा झाल्या आहेत. यातून फलंदाजांचं स्पर्धेतील वर्चस्व दिसून येतं. सनराजझर्स हैद्राबाद (SRH) संघाने आपल्या पहिल्याच साखळी सामन्यात ६ बाद २८६ अशी धावसंख्या रचली. आणि एका डावात ३०० हून जास्त धावा होण्याची चर्चा सुरूही झाली आहे.
(हेही वाचा – Lal Krishna Advani आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संजय राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य)
‘ही माझी वैयक्तिक मागणी नाहीए. गोलंदाजांचं म्हणणं मी आपल्यासमोर मांडत आहे. अनेक गोलंदाजांना हे बोलून दाखवायचं आहे. पण, काही जण घाबरुन गप्प आहेत. किंवा काहींना तशी संधी मिळालेली नाही. आयपीएलमध्ये (IPL 2025) खेळपट्ट्या अशा हव्यात की, त्यामुळे बॅट आणि चेंडूमध्ये स्पर्धा दिसेल. पण, सध्याचे सामने म्हणजे गोलंदाज अव्याहत मार खात असतात. आम्हालाही समान संधी हवी, एवढंच माझं सांगणं आहे,’ असं शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) पंजाब विरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना म्हणाला.
इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावरही शार्दूलने (Shardul Thakur) टीका केली. ‘जेव्हापासून इम्पॅक्ट खेळाडूचा नियम आला, आयपीएल बदलली आहे. मनोरजनासाठी हे ठिक आहे. पण, संघात यामुळे एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची संधी संघांना मिळाली आहे. यात गोलंदाजांचा विचारच होत नाहीए. इम्पॅक्ट नियमानंतर २५० धावा सहज होऊ लागल्या आहेत,’ असं निरीक्षणही त्याने मांडलं.
या हंगामात शार्दूल ठाकूरची (Shardul Thakur) भारतीय संघातून हकालपट्टी झाली. आणि त्यानंतर आयपीएलच्या मेगा लिलावातही त्याच्यावर सुरुवातीला बोली लागली नव्हती. पण, लखनौ संघाचा तेज गोलंदाज मोहसीन खान दुखापतग्रस्त झाल्यावर बदली खेळाडू म्हणून त्यांनी शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर दोन सामन्यांत शार्दूलने आतापर्यंत ६ बळी मिळवले आहेत. यात सनरायझर्स हैद्राबाद (SRH) विरुद्ध ४ बळींचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community