
-
ऋजुता लुकतुके
रविवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अरुण जेटली मैदानावर पार पडला. वातावरणात जी गरमी होती, ती मैदानावरही दिसली. अचूक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दिल्लीच्या करुण नायरने हल्ला चढवला तेव्हा मैदानावर दोन खेळाडूंमध्ये शेरेबाजी झाल्याचं दिसून आलं होतं. आता या प्रकाराला एक दिवस उलटून गेल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून, ‘सब ठिक है’ असा मथळा त्याला दिला आहे. म्हणजेच, वाद मिटल्याचंच त्यांनी लोकांना सांगितलं आहे. (IPL 2025, Bumrah vs Nair)
या व्हिडिओत सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांना आलिंगन देताना दिसतात :
(हेही वाचा – Ravindra Chavan यांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, राऊतांचं आडनाव… )
Sab theek hai bhai 🫂 pic.twitter.com/8pi2zFkh1w
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 14, 2025
मुंबईच्या ५ बाद २०६ धावांचा पाठलाग करताना करुण नायरने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली होती. ४० चेंडूंत ८९ धावा करत त्याने संघाला विजयाच्याही जवळ नेलं होतं. करुण नायरने मुंबईचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही नाही सोडलं. त्याच्या पहिल्या दोन षटकांत त्याने ३ चौकार आणि २ षटकार वसूल केले. या दरम्यान एका चेंडूनंतर धाव घेताना नायर आणि बुमराह यांची टक्कर झाली आणि नायरने त्यासाठी बुमराहची माफी मागितल्यावर बुमराहने मान दुसरीकडे वळवली, असं सामना चित्रित करणाऱ्या कॅमेरांनीही टिपलं. म्हणजेच बुमराहने माफी न स्वीकारता नायरकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे नायरही चिडलेला दिसला. (IPL 2025, Bumrah vs Nair)
दोघांमध्ये त्यानंतर झालेला वाद सोशल मीडियावर चांगलाच फिरत होता. पण, वादानंतर करुण नायरने मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याशी संवाद साधला. सामना संपल्यानंतर खुद्द बुमराह आणि करुण नायर एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. मुंबई इंडियन्सनी हा सामना १२ धावांनी जिंकला. पण, सामन्यादरम्यान करुण नायर आणि बुमराहसह मुंबईच्या इतर गोलंदाजांमध्ये रंगलेली जुगलबंदीही लोकांचं मनोरंजन करून गेली. (IPL 2025, Bumrah vs Nair)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community