IPL 2025 : आयपीएलच्या पुढील हंगामात फ्रँचाईजींना ५ खेळाडू कायम ठेवता येणार?

IPL 2025 : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी सगळ्यांचं लक्ष आहे ते खेळाडूंना कायम ठेवण्याच्या नियमाकडे

39
IPL Player Retention : कुठल्या खेळाडूंना कायम ठेवायचं यावरून मुंबई इंडियन्स संघासमोर पेच
  • ऋजुता लुकतुके 

आयपीएलच्या लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याच्या नियमात बीसीसीआय थोडा बदल करू शकतं. या हंगामापासून फ्रँचाईजींना ४ ऐवजी ५ खेळाडू आपल्याकडे कायम ठेवण्याची मुभा बीसीसीआय देईल, अशी शक्यता आहे. यापूर्वी संघ मालक ४ खेळाडू ठेवू शकत होते. लिलावात त्यांना राईट टू मॅचचा आणखी एक पर्याय उपलब्ध होत होता. आता राईट-टू-मॅच पर्यायाऐवजी आपल्याकडे कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची संख्या पाचवर जाऊ शकते. या पाच खेळाडूंपैकी किती भारतीय आणि किती परदेशी असतील हे मात्र अजून ठरलेलं नाही.  (IPL 2025)

(हेही वाचा- ‘मी बंगळुरू फ्रँचाईजीत जाणार हे ऐकूनच आता कंटाळा आलाय,’ – Rishabh Pant)

गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या संघांनी बोर्डाशी याबाबत चर्चा केली होती. बहुतांश फ्रँचायझी ५-६ खेळाडूंना कायम ठेवण्याची मागणी करत होते. बीसीसीआयने फ्रँचाईजींचं म्हणणं ऐकण्याचं ठरवलेलं दिसतंय. खेळाडूंचा मेगा लिलाव हा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. (IPL 2025)

५ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाली तर संघांचा यात फायदाच होणार आहे. सर्व फ्रँचायझींचं ब्रँड मूल्य यातून वाढेल.

(हेही वाचा- Sion Koliwada मध्ये झळकले बॅनर : ‘सायन कोळीवाडा जनता का आशीर्वाद…राजेश्री राजेश शिरवडकर के साथ’)

संघ त्यांच्याकडचे महत्त्वाचे खेळाडू कायम ठेवू शकतील. मुंबई-चेन्नईला याचा सर्वाधिक फायदा होईल.

एमएस धोनी आयपीएलचा दुसरा सीझनही खेळू शकतो.

बीसीसीआयने ५ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिल्याने मुंबई इंडियन्सला सर्वाधिक फायदा होणार आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या सारख्या कोअर ग्रुप खेळाडूंना कायम ठेवू शकेल. (IPL 2025)

गायकवाड, जडेजा, एमएस धोनी या खेळाडूंनाही चेन्नई कायम ठेवू शकते. राजस्थानकडे बटलर, संजू सॅमसन, अश्विन आणि चहल यांसारख्या बड्या खेळाडूंसोबत विदेशी खेळाडूंनाही ठेवण्याचा पर्याय असेल. (IPL 2025)

(हेही वाचा- Narendra Modi Meet Olympiad Teams : नरेंद्र मोदींना भारतीय बुद्धिबळपटूंकडून बुद्धिबळाचा पट भेट )

सध्या, लिलावासाठी राखून ठेवण्याच्या नियमांनुसार, एक संघ जास्तीत जास्त ४ खेळाडू ठेवू शकतो, तर एका खेळाडूला राईट टू मॅच कार्डसह समाविष्ट केले जाऊ शकते. अशा स्थितीत संघांना ५ खेळाडू कायम ठेवण्याची संधी मिळते. कोणत्याही संघाला जास्तीत जास्त २ परदेशी खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. बीसीसीआयने २०२१ मध्ये फ्रँचायझींना जास्तीत जास्त ४ खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली होती. (IPL 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.