IPL 2025 : कुठल्या खेळाडूंना कायम ठेवायचं ही चेन्नई फ्रँचाईजीची रणनीती ठरली, धोनीविषयी अजून गोंधळ

IPL 2025 : खेळाडूंच्या लिलावापूर्वी सर्वच संघ कुणाला कायम ठेवायचं याची योजना बनवत आहेत. 

117
IPL Player Retention : कुठल्या खेळाडूंना कायम ठेवायचं यावरून मुंबई इंडियन्स संघासमोर पेच
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये पुढील हंगाम हा नवीन लिलावाचा म्हणजे मेगा लिलावाचा असेल. अशावेळी सर्व फ्रँचाईजी आपल्याकडे फक्त ४ खेळाडू कायम ठेवू शकतात आणि बाकीचे सर्व खेळाडू पुन्हा लिलावाच्या फेऱ्यातून जातात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या मेगा लिलावाला आयपीएलमध्ये खूप महत्त्व आहे. पुढील हंगामासाठीचा लिलाव यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यापूर्वी कुणाला संघात कायम ठेवायंच आणि कुणाला मोकळं करायचं याचीच रणनीती आता संघ आखत आहेत. त्याचबरोबर नवीन खरेदीसाठी कोणते खेळाडू योग्य आहेत, हे ही फ्रँचाईजींना ठरवायचं आहे.

पैकी चेन्नई सुपरकिंग्जसमोर पेच आहे तो महेंद्रसिंग धोनीचा. धोनी तर त्यांना हवाय. पण, नेहमीपेक्षा कमी पैशात. म्हणूनच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंसाठी अननुभवी खेळाडूंइतकी बोली लागावी असा नियमांत बदल चेन्नईला हवा आहे. बीसीसीआयने अजून कुठलेही नवीन नियम जाहीर केलेले नाहीत. तर धोनी निवृत्त होणार की, आयपीएल खेळत राहणार हे त्याने स्पष्ट केलेलं नाही. अशावेळी चेन्नई संघाचा गोंधळ कायम आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – Viswanathan Anand : बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या युवा खेळाडूंवर असा आहे विशी आनंदचा प्रभाव

यादीत ‘या’ खेळाडूंचा समावेश 

आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी काही ढोबळ रणनीती बनवलेली दिसत आहे. खरंतर स्टार महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात खेळणार की नाही हे बीसीसीआयचे नियमच ठरवतील. मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई फ्रँचायजीने रिटेन्शन नियम लागू होण्यापूर्वीच आपले ५ खेळाडू ठरवले आहेत.

सीएसकेने मेगा लिलावापूर्वी ज्या खेळाडूंना कायम ठेवायचे आहे त्यांची यादी आधीच तयार केली आहे. ४ कायम ठेवायचे खेळाडू आणि राईट टू मॅच नियम वापरून आणखी दोन खेळाडूंना आपल्याकडे ठेवण्याचे अधिकार फ्रँचाईजींना मिळू शकतात. कर्णधार ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त, चेन्नईच्या यादीत रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – Tamilnadu: हिज्ब-उत-तहरीर संघटनेच्या विरोधात एनआयएची ११ ठिकाणी छापेमारी

चेन्नई संघाने बीसीसीआयकडे केली ‘ही’ विनंती

दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरेल मिशेल, महिश तिष्ना आणि अजिंक्य रहाणे यांना कायम ठेवण्याच्या यादीत स्थान मिळाले नाही. धोनी २०२५च्या हंगामात खेळावा यासाठी चेन्नई संघ त्यांच्या काही अव्वल खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेऊ शकते. चेन्नई संघाने बीसीसीआयकडे जुना नियम पुन्हा आणण्याची विनंती केली आहे. या नियमानुसार, निवृत्त खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूच्या पगारात मिळू शकतो.

निवृत्त खेळाडूंशी संबंधित नियम २००८ मध्ये पहिल्यांदा बनला होता. तो २०२१ पर्यंत कायम होता. धोनीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्याला निवृत्त होऊन ५ वर्षे झाली. बीसीसीआयने हा नियम पुन्हा लागू केल्यास धोनीचे खेळणे निश्चित होईल. चेन्नईचा संघ गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. यावेळी कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची खडतर कसोटी लागणार आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.