IPL 2025, DC vs LSG : पंतने शेवटच्या षटकांत केलेल्या चुकीनंतर संजीव गोएंका आणि पंत यांच्यात सामन्यानंतर चर्चा

शेवटच्या षटकांत पंतने अभिषेक वर्माला यष्टीचित करण्याची संधी गमावली.

96
IPL 2025, DC vs LSG : पंतने शेवटच्या षटकांत केलेल्या चुकीनंतर संजीव गोएंका आणि पंत यांच्यात सामन्यानंतर चर्चा
IPL 2025, DC vs LSG : पंतने शेवटच्या षटकांत केलेल्या चुकीनंतर संजीव गोएंका आणि पंत यांच्यात सामन्यानंतर चर्चा
  • ऋजुता लुकतुके

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (DC vs LSG) सामन्यात दिल्लीने अखेरच्या षटकांत विजय मिळवला. आणि लीगची सुरुवात विजयाने केली. खरंतर नाबाद ६६ धावा करणाऱ्या आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) लखनौच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून नेला, असंच म्हणावं लागेल. कारण, विजयासाठी २०९ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था ९ बाद १९२ झाली होती. आणि विजयासाठी अजून १८ धावा हव्या होत्या. तर शेवटच्या षटकांत दिल्लीला विजयासाठी ६ चेंडूंत ६ धावा हव्या होत्या. शेवटची जोडी मैदानावर होती. आणि नेमक्या अशावेळी लखनौचा कर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हातून एक चूक झाली. मोहीत शर्माला (Mohit Sharma) यष्टीचित करण्याची एक सोपी संधी त्याने वाया दवडली. त्यानंतर मोहीतने एकेरी धाव घेऊन फॉर्मात असलेल्या आशुतोष शर्माला (Ashutosh Sharma) फंलदाजीची संधी दिली. (IPL 2025)

आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३१ चेंडूंत नाबाद ६६ धावा केल्या. दिल्लीची अवस्था ५ बाद ६६ असताना आशुतोष मैदानात उतरला. त्याने सामन्याचा नूर पालटला. पण, चर्चेत राहिलं ते शेवटचं षटक. आणि त्यातही पंतने वाया घालवलेली यष्टीचितची संधी. चेंडू त्याच्या हातून निसटला. तर मोहीत शर्मा (Mohit Sharma) चांगला २ – ३ फूट बाहेर आलेला होता. (IPL 2025)

(हेही वाचा – Chhattisgarh Naxal Encounter : दंतेवाडा-बिजापूर सीमेवर 5 नक्षलवादी ठार ; मृतदेहांसह शस्त्रे जप्त)

त्यानंतर आशुतोषने उर्वरित धावा पूर्ण केल्या. आणि दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला. या कहाणीचा पुढील भाग त्यानंतर सुरू झाला. आधी पंतची हाराकिरी व्हायरल झालीच होती. त्यानंतर ऋषभ पंत, संघाचे मालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यातील चर्चा व्हायरल होत आहे. सामना संपवून पंत डगआऊटमध्ये आले तेव्हा गोएंका त्याची वाट पाहत असल्याचं दिसलं. आणि तिघांमध्ये गंभीर चर्चा रंगली होती. लोकांना त्यामुळे गेल्या हंगामात गोएंका आणि तेव्हाचा कर्णधार के एल राहुल यांच्यात अशाच रंगलेल्या कितीतरी चर्चांची आठवण झाली. आताही गोएंका काहीसे चिडलेले दिसले. आणि इंटरनेटवर त्यामुळे अनेक मिम्स व्हायरल झाली. (IPL 2025)

(हेही वाचा – Kuno National Park मधून बाहेर आले 5 चित्ते ; ग्रामस्थांची दगडफेक)

(हेही वाचा – BMC च्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून ५४० उमेदवारांना नोकरीची संधी)

खरंतर या सामन्यात २०९ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था दुसऱ्याच षटकांत २ बाद ७ अशी होती. आणि त्यानंतर निम्मा संघ ६५ धावांत परतला. त्यानंतर अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, ट्रिस्टियन स्टब्ज, विप्लब निगम यांनी संघाला विजय मिळवून दिला. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.