-
ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या (IPL 2025) दिल्ली कॅपिटल्स फ्रँचाईजीने नवीन हंगामासाठी माजी इंग्लिश कर्णधार केविन पीटरसनची मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. येत्या २१ मार्चपासून आयपीएलच्या नवीन हंगामाला सुरुवात होत आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आपल्या सोशल मीडिया खात्यांवर हा अपडेट दिला आहे. केविन पीटरसन (Kevin Pietersen) पूर्वी दिल्ली फ्रँचाईजीकडून खेळलेला आहे. आणि तो दिल्लीचा कर्णधारही होता. इंग्लंडकडून पीटरसन १०३ कसोटी खेळला आहे. त्याने कसोटीत ४७ धावांच्या सरासरीने ८,१८१ धावा करताना २३ शतकं आणि ३५ अर्धशतकं ठोकली आहेत.
‘केपी स्वगृही परतलाय,’ या शब्दांत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फ्रँचाईजीने ही बातमी सोशल माडियावर शेअर केली आहे.
(हेही वाचा – itbp : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस म्हणजेच ITBP यांना किती असतो पगार, माहितीय का?)
Tell the world, KP is back home! ❤️💙 pic.twitter.com/60QdLEiSCX
— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 27, 2025
१३६ एकदिवसीय सामन्यांत त्याने ९ शतकांच्या सहाय्याने ४,४४० धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर हजार आंतरराष्ट्रीय धावा आहेत. केविन पीटरसनने (Kevin Pietersen) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्विच शॉट हा फटका लोकप्रिय केला. २०१२ मध्ये तो पहिल्यांदा दिल्ली डेअरडेव्हिल्स फ्रँचाईजीकडून खेळला होता. तेव्हा त्याने १४७ च्या स्ट्राईकरेटने ३०५ धावा केल्या होत्या. २०१४ मध्ये त्याने दिल्ली फ्रँचाईजीचं नेतृत्वही केलं. पुढे २०१५ मध्ये सनरायझर्स हैद्राबादने त्याला २ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलं. पण, दुखापतीमुळे तो पूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता. आयपीएलमध्ये एक शतकही त्याच्या नावावर आहे. (IPL 2025)
पीटरसननेही लागलीच ट्विटरवर ही बातमी देताना, ‘दिल्ली का लड़का हूं, और दिल्ली लौटने पर खुश हूं,’ असा हिंदी संदेश लिहिला आहे. आणि विजेतेपद पटकावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी हमीही त्याने दिली आहे.
(हेही वाचा – Virat Kohli सचिनच्या १०० शतकांचा विक्रम मोडेल ; वसिम जाफर यांचं विधान)
मैं दिल्ली का लड़का हूं और दिल्ली अपने घर लौटने के लिए बहुत उत्साहित हूं। क्या 2025 वह साल होगा जब हम आईपीएल ट्रॉफी उठाएंगे? ऐसा करने के लिए हम वह सब कुछ करेंगे जो हम कर सकते हैं!@DelhiCapitals @IPL 🩵
— Kevin Pietersen🦏 (@KP24) February 27, 2025
आक्रमक कप्तान म्हणून केविन पीटरसनची (Kevin Pietersen) ओळख आहे. आणि त्याच्या कारकीर्दीत इंग्लिश संघाने ॲशेसमध्येही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवलं आहे. गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नियुक्तीपूर्वी बीसीसीआयने (BCCI) त्याच्याशी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही बोलणी केली होती. आता दिल्ली संघाला तो मार्गदर्शन करताना दिसणार आहे.
या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आपला कर्णधार अजून नियुक्त केलेला नाही. पण, तो के एल राहुल (KL Rahul) असेल अशी दाट शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ आपला पहिला सामना २४ मार्चला लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध खेळणार आहे. दिल्ली संघाने अजून एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावलेलं नाही. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community