IPL 2025, GT vs SRH : गुजरात वि. हैद्राबाद सामन्यात तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून नेमका काय वाद झाला?

IPL 2025, GT vs SRH : गुजरात वि. हैद्राबाद सामन्यात तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून नेमका काय वाद झाला?

60
IPL 2025, GT vs SRH : गुजरात वि. हैद्राबाद सामन्यात तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून नेमका काय वाद झाला?
IPL 2025, GT vs SRH : गुजरात वि. हैद्राबाद सामन्यात तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून नेमका काय वाद झाला?

ऋजुता लुकतुके

रविवारच्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (GT vs SRH) सामन्यात तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला. सामना गुजरात टायटन्सनी ७ गडी राखून आरामात जिंकला. (GT vs SRH) पण, त्यांचा एक फलंदाज वॉशिंग्टन सुंदरला बाद देण्यावरून काही काळ वादंग माजला होता. सोशल मीडियावर तर चाहत्यांनी जोरदार शेरेबाजी केली आहे. हा प्रसंग गुजरातच्या डावाच्या चौदाव्या षटकांत घडला. हैद्राबादच्या १५३ धावांचा पाठलाग करताना गुजरातची अवस्था तेव्हा २ बाद १०३६ अशी होती. आणि सुंदर २ षटकार आणि ५ चौकारांसह २९ चेंडूंत ४९ धावा करून खेळत होता. (IPL 2025)

तो चांगला फॉर्मात असताना महम्मद शामीच्या एका चेंडूवर त्याने स्वीपर कव्हरच्या दिशेनं हवेत फटका मारला. अनिकेत वर्मा झेल घेण्यासाठी धावला आणि त्याने चेंडू हातात पकडलाही. पण, मैदानावरील पंचांना झेल पूर्ण झाला आहे की नाही हे पडताळून पाहायंच होतं. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घ्यायचं ठरवलं. तिसऱ्या पंचांनी टीव्ही रिप्लेची मदत घेऊन फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा दिला. पण, हा निर्णयच वादग्रस्त ठरत आहे. कारण, काही फोटो पाहिले तर चेंडू जमिनीला स्पर्श करताना दिसत आहे. त्यामुळे या निर्णयाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. (GT vs SRH)

सोशल मीडियावर तर पोस्टचा महापूर आला आहे. चेंडू झेलताना तो हातात नीट बसावा लागतो. चेंडूचा हलकासा स्पर्श जरी जमिनीवर झाला तरी खेळाडू नाबाद ठरतो. पण, क्षेत्ररक्षकाचे हात जमिनीला लागले असतील, पण चेंडू सर्वबाजूंनी हातातच असेल, तर तो झेल दिला जातो. इथं चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्यांच काहींनी म्हटलं आहे. (GT vs SRH)

 

 

हैद्राबाद संघाची फलंदाजी सलग तिसऱ्या सामन्यांत ढेपाळली. आणि नितिश कुमार रेड्डी (३७) आणि हेन्री क्लासेन (२७) यांनी केलेल्या अर्धशतकी भागिदारीमुळे निदान हैद्राबाद संघाने दीडशेचा टप्पा ओलांडला. गुजरातकडून फॉर्मात असलेल्या महम्मद सिराजने ४ बळी मिळवले. गुजरातने धावांचा यशस्वी पाठलाग करताना ७ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार शुभमन गिलने नाबाद ६१ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने ४९ आणि शर्फेन रुदरफोर्डने नाबाद ३५ धावा केल्या. सलग ४ पराभवांमुळे गुणतालिकेत सनरायझर्स हैद्राबादचा संघ तळाला आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (GT vs SRH)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.