IPL 2025 : हरभजन सिंगवर वर्णद्वेषाचा आरोप, जोफ्रा आर्चरची केली लंडनच्या काळ्या टॅक्सीशी तुलना

आयपीएलच्या सामन्यादरम्यान समालोचन करताना हरभजनने ही टिपण्णी केली होती.

83
IPL 2025 : हरभजन सिंगवर वर्णद्वेषाचा आरोप, जोफ्रा आर्चरची केली लंडनच्या काळ्या टॅक्सीशी तुलना
IPL 2025 : हरभजन सिंगवर वर्णद्वेषाचा आरोप, जोफ्रा आर्चरची केली लंडनच्या काळ्या टॅक्सीशी तुलना
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यादरम्यान समालोचन करणाऱ्या हरभजन सिंगवर (Harbhajan Singh) आता वर्णद्वेषाचा आरोप होत आहे. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) या आफ्रो – इंग्लिश खेळाडूविषयी बोलताना हरभजनने असंवेदनशील शेरेबाजी केली आहे. सामन्यातील १८ व्या षटकांत आर्चर गोलंदाजी करत होता. आणि क्लासेनने त्याच्या गोलंदाजीवर लागोपाठ चौकार लगावले. एकूणच त्या सामन्यात आर्चरची धुलाई झाली. त्याच्या ४ षटकांमध्ये ७४ धावा निघाल्या. तेव्हा समालोचन करत असलेला हरभजन म्हणाला की, ‘लंडनमध्ये (London) काळ्या टॅक्सीचा मीटर खूपच जोराने पळतो. तसंच आर्चर (Jofra Archer) यांचं झालंय. त्याचाही धावांचा मीटर पळतोय.’

हरभजनच्या (Harbhajan Singh) या शेरेबाजीनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काहींनी हरभजनला तातडीने समालोचनाच्या पॅनलवरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. आर्चरला सनरायझर्स हैद्रबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) भरपूर मार पडला. आणि निर्धारित ४ षटकांत त्याने तब्बल ७६ धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही. आयपीएलच्या (IPL 2025) इतिहासातील ही सगळ्यात खराब गोलंदाजी ठरली आहे.

(हेही वाचा – Rani Baug मधील पेंग्विन कक्षाचे व्यवस्थापन पुन्हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवरच)

(हेही वाचा – Vidya – Sapno Ki Udan चित्रपटाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष प्रिमियर शो)

यापूर्वीही हरभजन सिंगवर (Harbhajan Singh) २००१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अँड्र्यू सायमंड्सला वर्षद्वेशी शेरेबाजी केल्याचा आरोप झाला होता. पण, त्यावेळी भारतीय भाषेतील एक शब्द हरभजनने सायमंड्ससाठी उच्चारला होता. आणि त्यात वर्णद्वेश नव्हता. त्यामुळे अख्खा भारतीय संघ हरभजनच्या बाजूने उभा राहिला होता. आणि चौकशीनंतर हरभजनची त्या आरोपातून मुक्तता करण्यात आली होती. सचिनसह इतर वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी हरभजनच्या बाजूने साक्ष दिली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.