IPL 2025 : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्याला मुकणार, कोण करणार नेतृत्व? 

IPL 2025 : हार्दिकवर आयपीएल प्रशासनाकडून कारवाई झाली आहे.

48
IPL 2025 : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्याला मुकणार, कोण करणार नेतृत्व? 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल २०२५ चं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही संघांसाठी जुने हिशोब चुकते करण्याची वेळ आली आहे आणि यात मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या सामन्यातच एक फटका बसणार आहे. मुंबईचा पहिला सामना २३ मे ला चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध चेन्नईच्या चेपक मैदानात होणार आहे. पण, या सामन्यांत चेन्नईचा कर्णधार हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. गेल्या हंगामातील एक चूक हार्दिकला महागात पडली आहे. गेल्या हंगामात साखळीतील शेवटचा सामना खेळताना मुंबईकडून आवश्यक ती षटकांची गती राखली गेली नाही आणि याचा फटका या हंगामात कर्णधाराला बसणार आहे. (IPL 2025)

मुंबई आणि चेन्नईचे संघ आयपीएलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात आणि एकाच गटात असल्यामुळे यंदाही त्यांची साखळी दरम्यान दोनदा गाठभेट होणार आहे. दुसरा साखळी सामना २० एप्रिलला मुंबईत होईल. याआधीच्या हंगामात या दोघांदरम्यान मुंबईत झालेला सामना चेन्नईने २० धावांनी जिंकला होता. (IPL 2025)

(हेही वाचा – Mahakumbh मध्ये आणखी एक विक्रम ; आतापर्यंत प्रयागराज विमानतळावर उतरली ६५० चार्टर्ड विमाने)

चेन्नई येथे होणाऱ्या या एल क्लासिको सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय खेळणार आहे. खरंतर, आयपीएल २०२४ च्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. पण, तेव्हा मुंबईचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला नव्हता. अशा परिस्थितीत ही बंदी संघाच्या पुढील सामन्यापर्यंत पुढे ढकलली जाते. तसंच आता होणार आहे. नवीन हंगामातील पहिल्या सामन्यात आधीच्या कारवाईची अंमलबजावणी होणार आहे. आयपीएलच्या नियमानुसार, एकाच संघाने हंगामात तीनदा षटकांची आवश्यक गती राखली नाही तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी लादण्यात येते. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025 : मुंबई इंडियन्स संघात जखमी गझनफरच्या जागी मुजीब उर रेहमान)

चेन्नईमध्ये हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व कोण करेल हे पाहणे मनोरंजक असेल, कारण त्यांच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव असलेले अनेक खेळाडू आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला रोहित शर्मा हा सर्वोत्तम पर्याय आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह आणि टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव देखील आहेत. (IPL 2025)

आयपीएल २०२४ हा मुंबई इंडियन्ससाठी खूप वाईट हंगाम होता. विशेषतः कर्णधार हार्दिक पांड्यासाठी, कारण मुंबई इंडियन्स संघ १४ पैकी फक्त ४ सामने जिंकून गुणतालिकेत तळाला राहिला आणि रोहितला वगळून हार्दिकला कर्णधार करण्याचा फ्रँचाईजीचा निर्णय चाहत्यांना अजिबात रुचला नाही. त्यामुळे सामन्या दरम्यान हार्दिकला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.