IPL 2025 : ‘घरच्या मैदानाचा फायदा मिळावा असं कुणाला वाटणार नाही,’ प्रशिक्षक चंदू पंडित यांचे विधान

43
IPL 2025 : ‘घरच्या मैदानाचा फायदा मिळावा असं कुणाला वाटणार नाही,’ प्रशिक्षक चंदू पंडित यांचे विधान
IPL 2025 : ‘घरच्या मैदानाचा फायदा मिळावा असं कुणाला वाटणार नाही,’ प्रशिक्षक चंदू पंडित यांचे विधान
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघ मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यासाठी मुंबईत वानखेडे स्टेड़िअमवर (Wankhede Stadium) आला तरी फ्रँचाईजी आणि क्युरेटरमधील संबंधांवरून सुरू झालेला वाद त्यांची पाठ सोडत नाहीए. संघाचे मुख्य प्रशिक्षक चंदू पंडित (Chandrakant Pandit) यांना इथंही मनासारखी खेळपट्टी यजमान संघाला मिळण्यावरून प्रश्न विचारण्यात आले. वादाविषयी बोलणं पंडित यांनी टाळलं. पण, जाता जाता एक वाक्य ते बोललेच. ‘यजमान संघ म्हणून घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळालेला कुणाला नको आहे?’ असं त्यांचं म्हणणं होतं.

‘घरच्या मैदानावर यजमान संघाकडून किंवा कर्णधाराकडून खेळपट्टीची अपेक्षा करणं चुकीचं नाही,’ असंही पंडित यांनी बोलून दाखवलं. यंदा आयपीएलमध्ये (IPL 2025) हा वाद सुरू झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यांसाठी फिरकीला पोषक खेळपट्टीची मागणी क्युरेटर सुजल मुखर्जी यांच्याकडे केली. पण, खेळपट्टी कर्णधाराला विचारून बनवत नाही, असं सांगत ही मागणी त्यांनी फेटाळली होती.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, जसप्रीत बुमराह क्रिकेट अकादमीत करतोय गोलंदाजी)

आयपीएलमध्ये (IPL 2025) फ्रँचाईजींना एकेक घरचं मैदान देण्यात आलं आहे. आणि त्या मैदानावर सामने खेळण्यासाठी फ्रँचाईजी मोठं शुल्क बीसीसीआयकडे (BCCI) भरत असतात. हे शुल्क प्रत्येक सामन्यासाठी जवळ जवळ ६० लाख रुपये इतकं आहे. आणि असं असताना, क्युरेटरने आपण बंगाल क्रिकेट असोसिएशनचे नोकर आहोत. आणि फ्रँचाईजींचं म्हणणं ऐकण्यासाठी बांधील नाही, असं म्हणणं कितपत योग्य आहे, असं विचारलं जात आहे.

‘सामन्यासाठी फ्रँचाईजी शुल्क भरत असली तरी त्यांनी मैदान विकत घेतलेलं नसतं. त्यामुळे सगळ्या गोष्टींवर त्यांचं नियंत्रण असणार नाही, हे मान्य आहे. पण, घरच्या मैदानाचा थो़डाफार तरी फायदा यजमान संघाला मिळाला पाहिजे. त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या गेल्या पाहिजेत,’ असं परखड मत चंदू पंडित (Chandrakant Pandit) यांनी व्यक्त केलं. कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) आतापर्यंत या आयपीएलमध्ये ३ पैकी १ सामना जिंकला आहे. तर २ सामने गमावले आहेत. स्पर्धेतील पहिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धचा सामना त्यांनी गमावला. त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्यांनी दिमाखात ८ गडी राखून विजय मिळवला. पण, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध पुन्हा त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.