-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स संघाची आयपीएल हंगामाची सुरुवात पुन्हा एकदा पराभवानेच झाली. २०१३ पासून फ्रँचाईजने हंगामातील पहिला सामना कधीही जिंकलेला नाही. यंदाही चेन्नई सुपर किंग्जनी त्यांचा ३ गडी राखून पराभव केला. मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्यावरील बंदीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवने या सामन्यात मुंबईचं नेतृत्व केलं. पहिल्या पराभवानंतर मिळालेल्या ७ दिवसांच्या विश्रांतीदरम्यान संघाने थेट जामनगर गाठलं आहे. तिथे विश्रांतीबरोबरच संघ बांधणीचे उपक्रम आखण्यात आले आहेत. (IPL 2025)
तिथे व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्येच एक आहे फ्रँचाईजीचा माजी कर्णधार रोहित शर्माचा बोट चालवतानाचा व्हिडिओ. यावेळी रोहितच्या हातात बॅट नाही तर स्पीड बोटचं सुकाणू आहे. रोहित वेगाने बोट चालवताना दिसत आहे. रोहितबरोबर बोटीत तिलक वर्मा आणि दोन सुरक्षा रक्षकही दिसत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना रविवारी झाल्यानंतर खेळाडूंनी लगेच जामनगर गाठलं होतं. (IPL 2025)
(हेही वाचा – BCCI : बीसीसीआयच्या वार्षिक करारांची लवकरच घोषणा, श्रेयस अय्यरची अ श्रेणीत वापसी?)
Rohit Sharma doing water sports in Jamnagar 🔥
— Rohan💫 (@rohann__45) March 26, 2025
मुंबईचा संघ आता पुढील सामन्यात गुजरात टायटन्सशी भिडणार आहेआणि हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. त्यामुळे अहमदाबादपासून काही किलोमीटर दूर असलेल्या जामनगरमध्ये खेळाडूंनी सरावापूर्वीचा वेळ घालवणं पसंत केलं आहे. संघात रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या असे कसलेले टी-२० फलंदाज असतानाही पहिल्या सामन्यात मुंबईची फलंदाजी फ्लॉप ठरली होती. संघ जेमतेम १५१ धावांची मजल मारू शकला. खासकरून रोहित शर्माचं अपयश उठून दिसणारं होतं. तो डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर भोपळा न फोडता बाद झाला. (IPL 2025)
मुंबईसाठी या हंगामात पदार्पण करणारा विघ्नेश पुथुरची गोलंदाजी मात्र चांगली चालली. त्याने या सामन्यात ३ गडी बाद केले. जयप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचं मुख्य शस्त्र आहे आणि पाठीच्या दुखापतीमुळे बुमरा अजून मुंबईच्या ताफ्यात दाखल झालेला नाही. किमान मार्च महिन्यातील सामने तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community