IPL 2025 : दुखापतग्रस्त राहुल द्रविड अखेर राजस्थान रॉयल्समध्ये दाखल

IPL 2025 : स्थानिक सामना खेळताना द्रविडच्या पायावर चेंडू लागला आहे.

36
IPL 2025 : दुखापतग्रस्त राहुल द्रविड अखेर राजस्थान रॉयल्समध्ये दाखल
  • ऋजुता लुकतुके

भारतात आता आयपीएलच्या नवीन हंगामाचे पडघम वाजू लागले आहेत आणि संघांची सराव शिबिरंही विविध ठिकाणी सुरू आहेत. राजस्थान रॉयल्सचं शिबीरही जयपूरमध्ये सुरू आहे. पण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड एक आठवडानंतर बुधवारी या शिबिरात दाखल झाले आहेत. गेल्या आठवड्यात बंगळुरूमध्ये एक स्थानिक क्लब स्तरावरील सामना खेळताना चेंडू पायाला लागून द्रविड यांना दुखापत झाली होती आणि त्यांचा पाय अजूनही प्लास्टरमध्ये आहे. त्यामुळे इतके दिवस ते जयपूरला गेले नव्हते. (IPL 2025)

‘आमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पायाच्या दुखापतीतून आता सावरले आहेत आणि लवकरच जयपूरमध्ये ते संघाच्या ताफ्यात शामील होतील,’ असं राजस्थान फ्रँचाईजीने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. यातील फोटोत द्रविडने आपल्या डाव्या पायाला तात्पुरतं प्लास्टर लावलेलं दिसत आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – 12th Answer Sheets : १२ वीच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळाल्या; निकालावर काय होईल परिणाम ?)

राहुल द्रविड अगदी सुरुवातीपासून राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीबरोबर आहे. २०११ ते २०१५ या कालावधीत तो संघाचा कर्णधार आणि नंतर मार्गदर्शक होता. २०१४ मध्ये तो पहिल्यांदा मार्गदर्शक झाला. आता भारतीय संघाबरोबरच्या मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षक म्हणून राजस्थान फ्रँचाईजीशी जोडला गेला आहे. त्याच्या कारकीर्दीत या संघातून संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल हे दोन खेळाडू भारतीय संघापर्यंत पोहोचले. (IPL 2025)

गेल्याच महिन्यात अनपेक्षितपणे राहुल द्रविड स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला. आपला मुलगा अन्वयबरोबर तो विजया क्रिकेट क्लबकडून क्लबस्तरीय सामना खेळला. या सामन्यात द्रविडला दुखापत झाली आणि तरीही तो ६६ चेंडू फलंदाजी करत होता. अखेर ५२ वर्षीय द्रविडला इतर खेळाडूंच्या मदतीने आधार देत बाहेर आणावं लागलं. तो लंगडत होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यावर आता तो जयपूरमध्ये दाखल झाला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ गेल्या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. तर हा संघ २०२२ चा उपविजेता संघ आहे. या संघाने २००८ मध्ये फक्त एकदा आयपीएल लीग जिंकली आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.