
- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या (IPL 2025) अठराव्या हंगामाला येत्या दोन दिवसांत सुरूवात होणार आहे. आणि यंदा बीसीसीआयला (BCCI) शानदार उद्घाटन सोहळा सादर करायचा आहे. कोलकाता इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघांदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. आणि त्यापूर्वी ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम रंगेल. याशिवाय आयपीएलचे सामने ज्या १३ शहरांत होणार आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी उद्घाटनाचा निदान छोटेखानी सोहळा रंगावा असा बीसीसीआयचा (BCCI) प्रयत्न आहे. नेमके कुठे कार्यक्रम होणार आणि त्यात कोण सहभागी होणार हे अजून उघड झालं नसलं, तरी बीसीसीआयचे (BCCI) शेवटच्या क्षणीही प्रयत्न सुरू आहेत.
उद्घाटन सोहळ्याला आयसीसीचे अध्यक्ष जय शाहही (Jay Shah) हजर राहणार आहेत. आणि त्याचवेळी बॉलिवूड स्टारनीही सोहळ्याला हजेरी लावावी यासाठी बीसीसीआयचे (BCCI) प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सलमान खान, माधुरी दिक्षित, वरुण धवन, अनन्या पांडे, कतरिना कैफ, जान्हवी कपूर या नावांची चर्चाही सुरू आहे. यापैकी कोलकाता इथं दिशा पटाणीचा (Disha Patani) कार्यक्रम होणार असल्याचं बीसीसीआयने (BCCI) जाहीरही केलं आहे. आयपीएलने (IPL 2025) आपल्या अधिकृत ट्विटरवर उद्घाटन सोहळा संध्याकाळी सहा वाजता रंगणार असल्याचं म्हटलं आहे.
(हेही वाचा – pm surya ghar muft bijli yojana चे तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा)
When it’s 18 years of IPL, it calls for a dazzling celebration like never before! 🥳
Who better than the sensational Disha Patani to set the stage ablaze? 💃
Don’t miss the electrifying Opening Ceremony of the #TATAIPL 18! 🤩 @DishPatani pic.twitter.com/3TeHjOdz67
— IndianPremierLeague (@IPL) March 19, 2025
(हेही वाचा – IPL 2025 : हार्दिकच्या अनुपस्थितीत सुर्यकुमार यादव करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व)
‘सर्व शहरांमध्ये पहिल्या सामन्याच्या दरम्यान असे कार्यक्रम व्हावेत असा बीसीसीआयचा (BCCI) मानस आहे. दोन डावांच्या मध्ये असलेल्या पंधरा मिनिटांत हे कार्यक्रम आयोजित करता येतील. त्यासाठी बीसीसीआयने प्रत्येक शहरांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी सुरू केली आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी स्पोर्ट्सस्टारला सांगितलं आहे. आयपीएल (IPL 2025) स्पर्धेची व्याप्ती वाढली आहे. १० संघ स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व ठिकाणी होणं हे तसं जिकिरीचं आहे. पण, राज्य संघटना आणि बीसीसीआय (BCCI) त्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत.
वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी बोलावण्यात येणार आहेत. यंदा १० संघांची १० घरची मैदानं आहेत. आणि त्याव्यतिरिक्त धरमशाला, मुल्लनपूर, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी इथंही सामने होणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community