IPL 2025 : के. एल. राहुल दिल्ली संघात परतला; पहिल्या सामन्यात घेतली होती पितृत्वाची रजा

IPL 2025 : दिल्लीचा पुढील सामना रविवारी हैद्राबादविरुद्ध होणार आहे.

59
IPL 2025 : के. एल. राहुल दिल्ली संघात परतला; पहिल्या सामन्यात घेतली होती पितृत्वाची रजा
  • ऋजुता लुकतुके

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुल पितृत्वाची रजा संपवून त्याची आयपीए फ्रँचाईजी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. पहिल्या सामच्याच्या एकच दिवस आधी राहुलला कन्यारत्न प्राप्त झालं. त्यामुळे पत्नी अथिया आणि नवजात मुलीबरोबर राहण्यासाठी त्याने ३ दिवसांची रजा घेतली होती. दिल्लीचा पहिला सामना सोमवारी लखनौ सुपर जायंट्स या राहुलच्या आधीच्या फ्रँचाईजीबरोबर झाला होता आणि हा सामना दिल्लीने जिंकलाही. (IPL 2025)

(हेही वाचा – Crop Insurance : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार)

राहुल सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळाने त्याने भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. मात्र तो भारताच्या टी-२० संघात नाहीआणि अलीकडेच त्याने टी-२० संघात परतण्याची मनिषा बोलून दाखवली होती. त्या दृष्टीने आयपीएल स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. राहुल आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पत्नी आथियाबरोबर मुंबईत होता. त्या काळात भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याबरोबर तो मुंबईत सराव करत होता. (IPL 2025)

(हेही वाचा – तरुण भारतचे संपादक Gajanan Nimdev यांची माहिती आयुक्तपदी निवड)

मागच्या ३ हंगामात राहुलने लखनौ सुपरजायंट्स या फ्रँचाईजीचं नेतृत्व केलं होतं. पण, गेल्या हंगामात संघ बाद फेरीत पोहोचू शकला नाही. दरम्यान संघाच्या कामगिरीवरून संघमालक संजीव गोयंका यांचंही राहुलशी पटत नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे गेल्यावर्षी लखनौ फ्रँचाईजीने राहुलला आपल्याकडे कायम ठेवलं नाही. अखेर खेळाडूंसाठी झालेल्या मेगा लिलावात राहुलवर १२ कोटी रुपयांची बोली लावत दिल्ली कॅपिटल्सनी त्याला विकत घेतलं आहे. राहुल आता दिल्ली विरुद्ध हैद्राबाद या सामन्यासाठी संघाला मिळाला असून विशाखापट्टणम इथं संघाचं शिबीर सुरू आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.