IPL 2025 KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्जचा बोचरा पराभव, या नकोशा गोष्टींतही संघ पहिला

46

ऋजुता लुकतुके

IPL 2025 KKR vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सनी (Kolkata night Riders) ८ गडी आणि ५९ चेंडू राखून विजय मिळवला. चेन्नईची फलंदाजी पुरती नेस्तनाबूत झाली. तर घऱच्या मैदानावर जिथे हा संघ अभेद्य म्हणून ओळखला जातो, तिथेच संघाचे सलग तीन पराभव या हंगामात झाले आहेत. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Captain Rituraj Gaikwad) अनुपस्थितीत महेंद्र सिंग धोणी या दिग्गज आणि संघाला पाचवेळा विजेतेपद पटकावून देणाऱ्या खेळाडूने संघाचं नेतृत्व केलं. पण, त्यालाही चेन्नईचं नशीब पालटवता आलं नाही.  (IPL 2025 KKR vs CSK)

(हेही वाचा – आता भाजपाचे लक्ष दक्षिणेकडे ! अण्णाद्रमुक-भाजपा युतीवर शिक्कामोर्तब ; Amit Shah यांची घोषणा

चेन्नई संघाचा या हंगामातील हा पाचवा पराभव होता. आणि तोही घरच्या मैदानावरील नीच्चांकी धावसंख्या रचून केलेला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती हे कोलकाताचे फिरकीपटू चेन्नईवर भारी पडले. तर सुनील नरेनने अष्टपैलू खेळ करताना चेन्नईला एकहाती पराभूत केलं. आधी त्याने १३ धावांत ३ बळी मिळवले. आणि त्यानंतर सलामीला येत १८ चेंडूंत ४४ धावा केल्या. यात त्याने ५ षटकारांची आतषबाजी केली. चेन्नईचा दारुण पराभव तिथेच स्पष्ट झाला. 

चेन्नईने समोर ठेवलेलं १०४ धावांचं लक्ष कोलकातने अगदी आरामात ११ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पूर्ण केलं. एकूण सामना फक्त साडेतीन तास चालला. कोलकाताकडून क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे आणि रिंकू सिंग या सगळ्यांनीच दमदार फलंदाजी केली. रहाणे २० तर रिंकू सिंग १५ धावांवर नाबाद राहिले. सुनील नरेनला अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा किताब मिळाला. 

चेन्नईने या हंगामात अनेक नकोसे विक्रम आपल्या नावावर केले आहेत 

  • घरच्या मैदानावर चेन्नईची ही नीच्चांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०१९ च्या हंगामात मुंबई विरुद्ध त्यांचा संघ १०९ धावांत बाद झाला होता. 
  • या हंगामातील त्यांचा हा सलग पाचवा पराभव आहे. सलग पराभवांच्या बाबतीत दिल्ली आणि पुणे वॉरिअर्स (Pune Warriors) त्यांच्या पुढे आहेत. या दोघांनी सलग ११ सामने गमावले होते. 
  • चेन्नई विरुद्ध सुनील नरेनने २५ बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुंबईच्या लसिथ मलिंगाने २६ बळी मिळवले आहेत. 
  • ९ बाद १०३ ही चेन्नईची तिसरी नीच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी मुंबई (Mumbai) विरुद्घ हा संघ ७९ आणि १०९ धावांत बाद झाला आहे.
    हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.