ऋजुता लुकतुके
IPL 2025 KKR vs CSK : शुक्रावरी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) या सामन्यादरम्यान एक वादग्रस्त प्रसंग घडला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Captain Mahendra Singh Dhoni) फारसा वादांमध्ये अडकत नाही. पण, यावेळी त्याला बाद देण्यावरूनच वाद निर्माण झाला आहे. चेन्नईचे चाहते या निर्णयावर प्रचंड संतापले आहेत. आणि त्यांनी इंटरनेटवर आपला रागही व्यक्त केला आहे. कोलकाता विरुद्घच्या सामन्यात सुनील नरेनच्या गोलंदाजीवर (Sunil Narine’s bowling) धोनीला पायचित बाद दिलं गेलं. धोनीने लगेचच डीआरएसची मदत घेतली. त्याला खात्री होती की, चेंडू बॅटला लागून गेला आहे. (IPL 2025 KKR vs CSK)
It was a clear edge that’s why dhoni t ook review without wasting a second. pic.twitter.com/8w1baUjRio
— MAHIYANK™ (@Mahiyank_78) April 11, 2025
(हेही वाचा – मुंबई पोलीस आयुक्तपदी Sadanand Date यांच्या नावाची चर्चा )
चेंडू बॅटच्या बाजूने जात असताना अल्ट्राएजवर थोडी हालचालही दिसली. ही रेषा सरळ नव्हती. पण, तिसऱ्या पंचांनी बराच वेळ खल केल्यानंतर धोनीला बाद दिलं. बॉलट्रॅकरवर चेंडू यष्टीच्या दिशेनं गेल्याचं दिसत होतं. आणि तेवढं कारण पंचांना पुरेसं होतं. चिदंबरम स्टेडिअम (Chidambaram Stadium) या निर्णयाने अवाक झालं. धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आणि ४ चेंडूंत जेमतेम एक धाव करत तो बाद झाला. चेन्नई सुपर किंग्जसाठी हा सामना एक दु:स्वप्नच ठरला. निर्धारित २० षटकांत त्यांचा संघ ९ बाद १०३ अशी विदारक धावसंख्या उभारू शकला. आणि कोलकाताने ८ गडी राखून अगदी आरामात विजय साकारला. इतकंच नाही तर चेन्नईतील हा संघाचा सलग तिसरा पराभव होता. घरच्या मैदानावर शेर समजल्या जाणाऱ्या चेन्नई संघावर यंदा ही वेळ आली. पण, दिवस अखेरीस गाजला तो महेंद्रसिंग धोनीचाच बळी. त्यावर उलट सुलट चर्चा होत राहिली.
Join Our WhatsApp CommunityDhoni Review System fails today 😥
Thala MS Dhoni reviews and is given out ❌#CSKvsKKR | #MSDhoni pic.twitter.com/pZyFJv39I6
— Indian Cricket Team (@incricketteam) April 11, 2025
हेही पहा –