IPL 2025, KKR vs CSK : ऋतुराज गायकवाड कोलकाता विरुद्ध का खेळला नाही?

कोपराचं हाड मोडल्यामुळे ऋतुराज उर्वरित हंगाम खेळू शकणार नाहीए.

42
IPL 2025, KKR vs CSK : ऋतुराज गायकवाड कोलकाता विरुद्ध का खेळला नाही?
IPL 2025, KKR vs CSK : ऋतुराज गायकवाड कोलकाता विरुद्ध का खेळला नाही?
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपरकिंग्ज संघाला कोलकाता (KKR vs CSK) विरुद्धच्या सामन्यापूर्वीच जोरदार धक्का बसला जेव्हा कोपराच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. फक्त हा सामनाच नाही तर उर्वरित हंगामालाही ऋतुराज (Ruturaj Gaikwad) मुकणार आहे. त्यामुळेच फ्रँचाईजीला त्याच्याऐवजी आधीचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) पुन्हा एकदा नेतृत्व सोपवावं लागलं आहे. पण, कोलकाता संघाविरुद्धचा सामना पार पडला तेव्हा ऋतुराज डगआऊटमध्ये बसलेला होता. त्यामुळे लोकांना असाच प्रश्न पडला की, इथं हिंडता फिरता दिसणारा ऋतुराज खेळत का नाहीए.

चेन्नई संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ‘राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटी इथं खेळतानाच ऋतुराजला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या हाताचं कोपर दुखावलं होतं. आम्ही आधी नियमित उपचार केले. आणि तो सामना तो हात दुखत असतानाच खेळला. एक्स-रे मध्ये काहीच निघालं नाही. त्यामुळे सुरुवातीला दुखापत नीट समजली नाही. पण, वेदना कायम असल्यामुळे एमआरआय केलं. आणि त्यात कोपराचं हाड थोडंसं दुखावलं आणि मोडल्याचं लक्षात आलं. त्यामुळे ऋतुराज (Ruturaj Gaikwad) उर्वरित हंगाम खेळू शकणार नाहीए,’ असं फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी स्पष्ट केलं. (IPL 2025, KKR vs CSK)

(हेही वाचा – UPI Down : यूपीआय पुन्हा डाऊन! एका महिन्यात दुसऱ्यांदा वापरकर्त्यांना नाहक त्रास)

जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) एक आखूड टप्प्याचा चेंडू ऋतुराजच्या कोपरावर बसला होता. त्यानंतर कोलकाता विरुद्ध धोनी नाणेफेकीसाठी आला, तेव्हाही त्याने ऋतुराज अख्खा हंगाम खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं.

‘संघात आम्ही दोन बदल केले आहेत. ऋतुराज ऐवजी राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) संघात आला आहे. ऋतुराजच्या कोपरात काहीतरी मोडलं आहे. त्यामुळे तो अख्खा हंगामच खेळू शकणार नाहीए. खरंतर हा खूप मोठा धक्का आहे. कारण, तो चांगल्या टायमिंगसाठी प्रसि्द्ध आहे. संघाचा तो आधारस्तंभ आहे. पण, दुखापतीला कुणीही काहीच करू शकत नाही,’ असं धोनी (MS Dhoni) म्हणाला होता. चेन्नईला सामने जिंकायचे असतील तर चांगली फलंदाजी करावी लागेल, असंही धोनीने म्हटलं होतं. चेन्नईला आता ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) बदली खेळाडू निवडावा लागणार आहे. (IPL 2025, KKR vs CSK)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.