ऋजुता लुकतुके
आयपीएलचे (IPL 2025) सामने प्रत्येकी २० मिनिटांचे असले तरी त्यात ॲक्शन भरपूर असते. आणि सामने कुठल्याही चेंडूवर पलटू शकतात. हेच कोलकाता विरुद्ध पंजाब (KKR vs PBKS) या सामन्याने दाखवून दिलं. मुल्लानपूरच्या नवीन मैदानातील हा फक्त दुसरा सामना होता. आणि या खेळपट्टीने फलंदाजांची अक्षरश: परीक्षा पाहिली. पंजाबने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. त्यांच्या सलामीच्या जोडीने ३९ धावांची भागिदारी केली. हीच सामन्यातील सर्वोत्तम भागिदारी आणि सर्वोत्तम धावसंख्याही. बाकी कोलकाताच्या अंगक्रिश रघुवंशीचा (३७) अपवाद सोडला तर सामन्यात गोलंदाजांनीच वर्चस्व गाजवलं. आणि संपूर्ण सामन्यात मिळून २०६ धावा झाल्या. (KKR vs PBKS)
हेही वाचा-Cement concrete Road : यापुढे एकही रस्ता खोदला जाणार नाही खड्डाही पडणार नाही !
महत्त्वाचं म्हणजे विजयासाठी ११२ धावा हव्या असताना आणि ४ बाद ७७ अशा सुस्थितीत असताना कोलकाताचा डाव नाट्यमयरित्या कोसळला. अंगक्रिश रघुवंशीचा तेव्हा जम बसला होता. पण, चहलच्या गोलंदाजीवर तो बॅरेटकडे झेल देऊन बाद झाला. आणि त्यानंतर वेंकटेस अय्यर (७), रिंकू सिंग (२), रमणदीप सिंग (०), हर्षित राणा (३), वैभव अरोरा (०) यांची रांगच लागली. यजुवेंद्र चहलने सामन्याला कलाटणी देताना ४ षटकांत २८ धावांत ४ बळी मिळवले. (KKR vs PBKS)
हेही वाचा- Nashik काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवण्यास सुरूवात ; जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, ४ ते ५ पोलिस जखमी
कोलकाताचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आंद्रे रसेल मैदानावर असताना कोलकाताला विजयाच्या आशा होत्या. त्याने चहलच्या एका षटकात १६ धावा वसूल करून निकराचा प्रयत़्नही केला. पण, हा दिवसच गोलंदाजांचा होता. आणि दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने रसेल शेवटी एकाकी पडला. दहावा बळी त्याचाच गेला. पंजाबकडून चहलने ४ तर मार्को यानसेनने ३ बळी मिळवले. (KKR vs PBKS)
𝙏𝙃𝙄𝙎. 𝙄𝙎. 𝘾𝙄𝙉𝙀𝙈𝘼 🎬#PBKS have pulled off one of the greatest thrillers in #TATAIPL history 😮
Scorecard ▶️ https://t.co/sZtJIQpcbx#PBKSvKKR | @PunjabKingsIPL pic.twitter.com/vYY6rX8TdG
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने २००९ मध्ये पंजाब विरुद्धच ११९ ही धावसंख्या यशस्वीपणे राखली होती. तो विक्रम आता मोडीत निघाला आहे. पंजाबने आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येचं यशस्वीपणे संरक्षण करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यापूर्वी पंजाब संघाची फलंदाजीही कोसळली. चांगल्या सुरुवातीनंतर त्यांच्या मधळ्या फळीने हाराकिरी केली. श्रेयस अय्यर (०), जोश इंग्लिश (२), नेहल वढेरा (१०), ग्लेन मॅक्सवेल (८) झटपट बाद झाल्यामुळे पंजाबचा संघ शतकी मजल तरी मारतो की नाही अशी वेळ आली होती. पण, शशांक सिंगने १८ आणि झेविअर बारलेटने ११ धावा करत निदान पंजाबला १०० पार नेलं. (KKR vs PBKS)
हेही वाचा- रुग्णालयातून बाळ चोरीस गेल्यास परवाना रद्द होणार ; Supreme Court चे राज्य सरकारला निर्देश
कोलकाताकडून हर्षित राणाने ३ तर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी दोन बळी मिळवले. यजुवेंद्र चहलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या विजयामुळे पंजाब किंग्ज इलेव्हनचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर कोलकाता संघ सहाव्या स्थानावर ढकलला गेला आहे. (KKR vs PBKS)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community