IPL 2025 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता संघ आपलं घरचं मैदान बदलणार?

IPL 2025 : कोलकाता संघाची खेळपट्टीची मागणी ईडन गार्डन्स क्युरेटरने नाकारली होती.

49
IPL 2025 : ‘आयपीएलमध्येही घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळाला पाहिजे,’ - अरुण लाल
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचाईजीने आपला पहिला बंगळुरू विरुद्धचा सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखून मात केली. गुवाहाटीला हा सामना झाला होता. तर पहिला सामना घरच्या मैदानात म्हणजे ईडन गार्डन्सवर झाला होता. तिथे कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्या रहाणेनं खेळपट्टी तयार करणाऱ्या क्युरेटरकडे फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करण्याची विनंती केली होती. पण, ती क्युरेटरने फेटाळून लावली. यजमान संघ असला तरी कर्णधार क्युरेटरकडे मागणी करू शकत नाही, असं उत्तर रहाणेला मिळालं होतं. यावर आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपाने हादरला ! इमारती कोसळल्या, बँकॉकमध्ये आणीबाणी)

त्यावर आयपीएलमध्ये समालोचन करणारा माजी किवी क्रिकेटपटू सायमन डूलने चक्क कोलकाता नाईट रायडर्सनी घरचं मैदान बदलावं अशी सूचना केली आहे. ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजन मुखर्जी आहेत. ‘जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत खेळपट्टी बदलणार नाही,’ असं उत्तर मुखर्जी यांनी रहाणेला दिलं होतं. यावर सायमन डूल म्हणतो, ‘क्युरेटरच काम सामन्यावर टिप्पणी करणं हे नाहीच आहे. कोलकाता नाईट रायडर्सचं घरचं मैदान असताना क्युरेटरने त्याचं ऐकायला हवं. कोलकाता फ्रँचाईजी मैदानासाठी शुल्क भरत आहे. बाकी सगळी व्यवस्था पाहत आह  आणि हेच त्यांचं घरचं मैदान आहे. अशावेळी क्युरेटरने कर्णधाराची सूचना ऐकली पाहिजे. तसं होत नसेल तर कोलकाता फ्रँचाईजीने मैदान बदलण्याचा विचार करावा.’ डूल क्रिकबझ या वेबसाईटशी बोलत होता. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025, LSG BT SRH : लखनौच्या विजयानंतर फ्रँचाईजी मालक गोयंका यांनी पंतला मारली मिठी)

‘कर्णधार म्हणून मी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी मागितली तर यात माझं काहीही चुकत नाहीए. मी १२० धावांची खेळपट्टी बनवा असं सांगत नाहीए. तसं असतानाही क्युरेटर माझं ऐकत नसेल तर मला ते नक्कीच आवडणार नाही,’ असं डूल यांनी आग्रहाने बोलून दाखवलं. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा यजमान संघाला मिळाला तर ते वाईट नाही, असं सायमन डूलचं मत आहे. त्यासाठीच त्याने हे विचार बोलून दाखवले आहेत. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.