IPL 2025 : कोलकाता वि. लखनौ सामना आता गुवाहाटीत

IPL 2025 : राम नवमीमुळे हा सामना कोलकात्यातून हलवावा लागला.

59
IPL 2025 : कोलकाता वि. लखनौ सामना आता गुवाहाटीत
  • ऋजुता लुकतुके

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्‌स हा आयपीएलचा सामना अखेर कोलकात्यातून गुवाहाटी इथं हलवण्यात आला आहे. ६ एप्रिलला होणाऱ्या या सामन्यात कोलकाता संघ यजमान संघ असेल. पण, ६ एप्रिलला राम नवमी आहे. अशावेळी कोलकात्यात विविध कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवायला असमर्थता दाखवली होती. त्यामुळे अखेर हा सामना कोलकात्यातून गुवाहाटीत हलवण्याचं बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी जाहीर केलं आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करा; Ravindra Waikar यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी)

भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी राम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधून २०,००० च्या वर यात्रा काढण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताचा ताण आहे. राम नवमीच्या विविध कार्यक्रमांमुळे सामना ईडन गार्डन्सला भरवणं शक्य होणार नाही, असं आम्ही आधीच बीसीसीआयला कळवलं होतं. सामना पुढे ढकलणंही वेळापत्रक पाहता शक्य होणार नव्हतं. त्यामुळे मग हा सामना दुसरीकडे हलवण्यात आला आहे,‘ असं गांगुली पीटीआयशी बोलताना म्हणाले. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमधील दुसऱ्या नवीन चेंडूचा नियम नेमका काय आहे?)

लखनौ सुपर जायंट्‌स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना हा नेहमी गर्दी खेचणारा ठरतो. लखनौ फ्रँचाईजीचे मालक संजीव गोयंका हे बंगालचे आहेत आणि मूळात कोलकाता इथं दोन्ही संघांचे पाठिराखे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या सामन्याला जवळ जवळ डर्बीचं स्वरुप येतं. सामना कोलकाता इथं झाला असता तर तो हाऊस फुल्ल होण्याची दाट शक्यता होती. आता हा सामना आधीप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजता फक्त गुवाहाटीत होईल. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.