-
ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या अठराव्या हंगामाचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत घणाघाती फलंदाजीबरोबरच अनेकदा धारदार गोलंदाजीही पाहायला मिळाली आहे. सनरायझर्स हैद्राबादने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच डावांत ३०० धावा करण्याची गर्जना यावेळी केली आहे. त्यामुळे हा हंगामही रंगतदार होणार हे नक्की आहे. गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेच्या निमित्ताने जाणून घेऊया आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक धावा कुणी केल्या आहेत? तसंच सर्वाधिक बळी कुणी मिळवले आहेत? सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या कुणाची आहे? पाहूया आयपीएलचे सर्वकालीन विक्रम… (IPL 2025)
(हेही वाचा – कर्नाटकात सत्ताधारी Congress ची दडपशाही; विधानसभेत विरोध करणाऱ्या भाजपाच्या १८ आमदारांना केले निलंबित)
आयपीएलमघील सर्वाधिक यशस्वी फ्रँचाईजी
मुंबई इंडियन्स (५ विजेतेपद) – २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२०
चेन्नई सुपरकिंग्ज (५ विजेतेपदं) – २०१०, २०११, २०१८, २०२१ व २०२३
कोलकाता नाईटरायडर्स (३ विजेतेपदं) – २०१२, २०१४ व २०२४
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा (सर्व फ्रँचाईजी मिळून)
विराट कोहली – ८००४
शिखर धवन – ६७६९
रोहित शर्मा – ६६२८
डेव्हिड वॉर्नर – ६५६५
सुरेश रैना – ५५२८ (IPL 2025)
(हेही वाचा – Nagpur Violance : नागपूरचा हिंसाचार पूर्वनियोजित ! मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक)
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
ख्रिस गेल – १७५ (६६ चेंडूंत, सामना – बंगळुरू वि. पुणे)
ब्रँडन मॅक्युलन – १५८* (७३ चेंडूंमध्ये – कोलकाता वि. बंगळुरू)
क्विंटन डी कॉक – १४०* (७० चेंडू – लखनौ वि. कोलकाता)
एबी डिव्हिलिअर्स – १३३* (५९ चेंडू – बंगळुरू वि. मुंबई)
के. एल. राहुल – १३२* (६९ चेंडू – पंजाब वि. बंगळुरू)
सर्वाधिक बळी
यजुवेंद्र चहल – २०५
पियुष चावला – १९२
ड्वेन ब्राव्हो – १८३
भुवनेश्वर कुमार – १८१
सूनिल नरेन – १८० (IPL 2025)
(हेही वाचा – हजारो किमी दूरवरची भाषा तुम्ही शिकू शकता, मात्र…; Amit Shah यांनी तामिळनाडू सरकारला सुनावले)
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू
महेंद्रसिंग धोनी – २६४
दिनेश कार्तिक – २५७
रोहित शर्मा – २५७
विराट कोहली – २५२
रवींद्र जडेजा – २४०
सर्वाधिक झेल
विराट कोहली – ११४
सुरेश रैना – १०९
कायरन पोलार्ड – १०३
रवींद्र जडेजा – १०३
रोहित शर्मा – १०१ (IPL 2025)
(हेही वाचा – लोकसभेतील अनेक खासदार ‘ओव्हर वेट’; आरोग्य तपासणी करण्याचा JP Nadda यांचा सल्ला)
सगळ्या मोठी धावसंख्या (सांघिक)
हैद्राबाद वि. बंगळुरू – २८७/३
हैद्राबाद वि. मुंबई – २७७/३
कोलकाता वि. दिल्ली – २७२/७
हैद्राबाद वि. दिल्ली – २६६/७
बंगळुरू वि. पुणे – २६३/५
मोठ्या फरकाने मिळवलेले विजय
मुंबई वि. दिल्ली – १४६ धावा
बंगळुरू वि. गुजरात – १४४ धावा
कोलकाता वि. बंगळुरू – १४१ धावा
बंगळुरू वि. पंजाब – १३८ धावा
बंगळुरू वि. पुणे – १३० धावा (IPL 2025)
(हेही वाचा – वंचितांप्रतीची संवेदनशीलता देशासह समाजाची प्रतिष्ठा ठरवते; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचे प्रतिपादन)
नीच्चांकी धावसंख्या
बंगळुरू वि. कोलकाता – ४९
राजस्थान वि. बंगळुरू – ५८
राजस्थान वि. बंगळुरू – ५९
दिल्ली वि. मुंबई – ६६
दिल्ली वि. पंजाब – ६७ (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community