IPL 2025, LSG BT SRH : लखनौच्या विजयानंतर फ्रँचाईजी मालक गोयंका यांनी पंतला मारली मिठी

IPL 2025, LSG BT SRH : गोयंका खराब कामगिरीनंतर कर्णधारावर तोंडसुख घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

70
IPL 2025, LSG BT SRH : लखनौच्या विजयानंतर फ्रँचाईजी मालक गोयंका यांनी पंतला मारली मिठी
  • ऋजुता लुकतुके

लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी संघाच्या पराभवांनंतर गेल्या हंगामात के. एल. राहुल आणि या हंगामात रिषभ पंत या कर्णधारांना दिलेली तंबी आणि मैदानातच दोघांशी घातलेला वाद लोक इतक्यात विसरलेले नाहीत. यातील पंतवर रोखलेली करडी नजर तर काही दिवसांपूर्वीची आहे. त्याच गोयंका यांनी आपल्या संघाने सनरायझर्स हैद्राबादवर ५ गडी राखून विजय मिळवल्यावर रिषभ पंतला जोरदार आलिंगन दिलं. हा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे ट्रेव्हिस हेड, ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन अशी तगडी फलंदाजांची फळी असलेला हैद्राबाद संघ या हंगामात ३०० च्या पार जाण्यासाठी उत्सुक आहे. अशावेळी लखनौच्या गोलंदाजांनी त्यांना १९१ धावांत रोखलं. (IPL 2025, LSG BT SRH)

(हेही वाचा – Legislature Committees : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना धक्का! भुजबळ-मुंडे समित्यांबाहेर, अजित पवारांचा रणनीतिक डाव?)

त्यासाठी शार्दूल ठाकूरने ३४ धावांत ४ बळी मिळवले. तर प्रिन्स यादवने आयपीए पदार्पणातच पहिला बळी मिळवला तो धोकादायक ट्रेव्हिस हेडचा. एकाही फलंदाजाचं अर्धशतक न झाल्यामुळे हैद्राबादचा संघ १९१ धावांचीच मजल मारू शकला. ही धावसंख्या लखनौ संघाने तब्बल ४ षटकं राखून पूर्ण केली. मिचेल मार्शने ५२ तर निकोलस पुरनने ७२ धावा केल्या. अब्दुल समाद ८ चेंडूंत २२ धावा करून नाबाद राहिला. या विजयामुळे लखनौ संघाने या हंगामातील आपला पहिला साखळी सामना जिंकला आणि मौल्यवान २ गुणांची कमाई केली. फ्रँचाईजी मालक संजीव गोयंका अर्थातच त्यामुळे खुश झाले. सामना संपल्यानंतर संघाच्या डगआऊटमध्ये त्यांनी कर्णधार रिषभ पंतला जोरदार मिठी मारली. संघाच्या विजयाचा आनंद ते लपवू शकत नव्हते. (IPL 2025, LSG BT SRH)

(हेही वाचा – West Bengal मध्ये हिंसाचार; हिंदूंच्या दुकानांना आणि घरांना धर्मांधांनी केले लक्ष्य)

हा प्रसंग लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर प्रतिक्रियाही उमटल्या : 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.