-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपरजायंट्स संघाने शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा अटीतटीच्या सामन्यात १२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे संघ गुण तालिकेतही सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर संघाला रविवारी एक चांगली बातमीही मिळाली आहे. ताशी १५० किमींच्या वेगाने गोलंदाजी करू शकणारा युवा गोलंदाज मयंक यादव दुखापतीतून सावरतो आहे. लवकरच पुनरागमनाच्या तयारीत आहे. लखनौ फ्रँचाईजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. ‘सध्या नेट्समध्ये ९० ते ९५ टक्के क्षमतेनं तो गोलंदाजी करत आहे,’ असं लँगर यांनी बोलून दाखवलं. (IPL 2025, Lucknow Super Giants)
(हेही वाचा – Mumbai Police : मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; परिमंडळ ७ झाले आयएसओ प्रमाणित)
लँगर पुढे म्हणतात, ‘मयंक अजूनही बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीतच आहे. पण, त्याचे ताजे व्हिडिओ मी पाहिले आहेत. आणि तो ९० ते ९५ टक्के क्षमतेनं काम करताना दिसत आहे. मयंकपेक्षा वेगवान दुसरा गोलंदाज भारताकडे या क्षणी आहे, असं मला वाटत नाही. गेल्या हंगामातील कामगिरीने त्याने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता आकाशदीप, आवेश हे आमचे आणखी दोन खेळाडूही काही दिवसांपूर्वीपर्यंत बंगळुरूतच होते. त्यामुळे क्रिकेट अकादमीने खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर चांगली मेहनत घेतली आहे,’ असं लँगर यांनी पत्रकारांना सांगितलं. (IPL 2025, Lucknow Super Giants)
(हेही वाचा – Indian Navy ने वाचवला पाकिस्तानी मच्छिमाराचा जीव ; समुद्रात केली शस्त्रक्रिया)
मयंक नेमका कुठला सामना खेळू शकेल, हे अजून निश्चित नाही आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने अजून मयंकला खेळण्याची परवानगीही दिलेली नाही. पण, मयंक आणि आकाशदीपच्या अनुपस्थितीत लखनौ संघाची गोलंदाजी दुबळी बनली होती. मोहसीन खान आजारी पडल्यावर त्याच्या जागी फ्रँचाईजीने शार्दूल ठाकूरला करारबद्ध केलं. आतापर्यंत शार्दूलने संधीचं सोनं केलं आहे. सध्या शार्दूलसह आवेश खान आणि आकाशदीप हे तिघे तेज गोलंदाज बंगळुरूच्या ताफ्यात आहेत. आकाशदीपलाही दुखापतीमुळे पहिले तीन सामने खेळता आले नव्हते. (IPL 2025, Lucknow Super Giants)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community