
ऋजुता लुकतुके
आधीच चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामात आतापर्यंत एकमेव सामना जिंकू शकला आहे. त्यातच आता संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संघाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या हातात आली आहे. संघासाठी गायकवाडचं नसणं हा धक्का आहे. पण, त्याचवेळी धोनी पुन्हा कर्णधार झाल्यामुळे चेन्नई समर्थकांनी इंटरनेटवर जल्लोष केला आहे.
चेन्नईचा संघ शुक्रवारी घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सबरोबर दोन हात करणार आहे. आणि या सामन्यापूर्वी चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी ही बातमी पत्रकारांना दिली. ‘ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम खेळू शकणार नाहीए. त्यामुळे धोणी संघाचा कर्णधार असेल,’ असं फ्लेमिंगने स्पष्ट केलं. त्याचबरोबर ऋतुराजच्या जागी संघात कोण येणार हा प्रश्नही होताच. पण, त्याला थेट उत्तर द्यायचं फ्लेमिंग यांनी टाळलं आहे.
🚨 News 🚨
🗣 #CSK Head Coach Stephen Fleming announces MS Dhoni’s return to captaincy as Ruturaj Gaikwad is ruled out of #TATAIPL 2025 due to an injury. pic.twitter.com/Far8uAleam
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
महेंद्रसिंग धोनीने विक्रमी २३५ सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व केलं आहे. आणि त्याच्या कप्तानीखालीच चेन्नईने पाचही विजेतेपदं पटकावली आहेत. २०२२ मध्ये फ्रँचाईजीने रवींद्र जाडेजाला कर्णधार केलं होतं. पण, संघाच्या खराब कामगिरीनंतर हंगामाच्या मध्यातच धोनी पुन्हा कर्णधार झाला. २०२४ मध्ये धोणी कर्णधारपदावरून पायउतार झाला. आणि त्याच्या जागी ऋतुराज गायकवा़डची निवड करण्यात आली. मागच्या हंगामात चेन्नईने बाद फेरी गाठली होती. पण, यंदा त्यांना ५ पैकी एकमेव सामना जिंकता आला आहे.
धोनी पुन्हा संघाचा कर्णधार झाल्यावर इंटरनेटवर मात्र चाहत्यांनी जल्लोष केला आहे.
Captain MS Dhoni is back to lead CSK 😭❤️ pic.twitter.com/ZpjgImwklb
— MAHIYANK™ (@Mahiyank_78) April 10, 2025
MS Dhoni be like pic.twitter.com/4pcCoBuIgd
— Sagar (@sagarcasm) April 10, 2025
धोनीला चेन्नईत कौतुकाने ‘थाला’ म्हटलं जातं. उर्वरित ५ साखळी सामन्यांत जास्तीत जास्त विजय मिळवून चेन्नईला बाद फेरी गाठून देण्याचं आव्हान आता धोनीसमोर असेल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community