IPL 2025 : धोनी आणि द्रविड यांची सामन्यानंतर गळाभेट; सोशल मीडियावर व्हायरल

IPL 2025 : राजस्थान वि. चेन्नई सामन्यानंतर दोन दिग्गज खेळाडूंची ही भेट झाली.

49
IPL 2025 : धोनी आणि द्रविड यांची सामन्यानंतर गळाभेट; सोशल मीडियवर व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. अगदी शेवटच्या षटकांतही जेमी ओव्हरटनने मोक्याच्या क्षणी षटकार खेचून सामन्यात रंग भरला. ३ चेंडूंत १७ धावा हव्या असताना ओव्हरटने षटकाराने उत्तर दिलं होतं. हा सामना जसा रंगतदार झाला तशीच सामना संपल्यानंतरची एक ‘ग्रेटभेट’ सगळ्यांसाठीच यादगार ठरली. राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पायाला दुखापत झालेली असूनही सामन्यात सक्रिय होता. कुबड्या घेऊन तो मैदानात हजर होता. या सामन्यात चेन्नईचा ६ धावांनी पराभव झाला. पराभव विसरून महेंद्रसिंग धोनी सामना संपल्यानंतर थेट राहुल द्रविडला भेटण्यासाठी गेला. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि दोघांमध्ये हलकी फुलकी चर्चाही झाली. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025, MI vs KKR : ‘रोहित शर्माच्या हातातून वेळ निसटत चालली आहे,’ – संजय मांजरेकर)

धोनी आणि द्रविड भारतीय संघात काही वर्षं एकत्र खेळले आहेत. त्यामुळे सामन्यानंतर द्रविडला मैदानात पाहून धोनी लगेचच द्रविडकडे चालत गेला. विशेष म्हणजे धोनीला पाहून इतर चेन्नईचे खेळाडूही द्रविडकडे गेले आणि त्यांनीही शुभेच्छा दिल्या. आयपीएल सुरू होण्यापूर्वी बंगळुरूमध्ये एक स्थानिक सामना खेळताना द्रविडला पायाची दुखापत झाली होती. आणि लिगामेंट तुटल्यामुळे तो तेव्हापासून कुबड्यांच्या मदतीनेच चालतोय. पण, राजस्थान रॉयल्स संघाबरोबर तो पहिल्यापासून सक्रिय आहे. व्हीलचेअर किंवा कुबड्यांच्या आधाराने चालत तो संघाच्या सर्व सराव आणि सामन्यांच्या वेळी हजर असतो. आताही दोन दिग्गजांची भेट सोशल मीडियावर क्षणांत व्हायरल झाली. ‘महेंद्रसिंग धोनी व राहुल द्रविड! भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू एकाच फ्रेममध्ये,’ अशी एक प्रतिक्रिया होती. तर ‘दिग्गज खेळाडूंमधील खिलाडूवृत्ती,’ असं आणखी एक चाहत्याने म्हटलं आहे. ‘दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला आदर बघण्यासारखा आहे,’ असं आणखी एका चाहत्याने म्हटलं आहे. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.