-
ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होणार आहे. आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने हा सामना संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. असं असताना, संघाच्या नेतृत्वात बदल होऊ शकतो, असं सूतोवाच संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक मायकेल हसी (Michael Hussey) यांनी केलं आहे. हा बदल म्हणजे महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) पुन्हा फ्रँचाईजीचं नेतृत्व करणार असाच अंदाज बांधण्यात येत आहे. शनिवारी चिदंबरम मैदानावरच हा सामना होणार आहे. आणि नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) बोटाला आधीच्या सामन्यात दुखापत झाली आहे. अशावेळी तो खेळण्याचीही शक्यता कमीच आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – Vilas Ujwane : ‘चार दिवस सासूचे’ फेम प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन)
‘ऋतुराज (Ruturaj Gaikwad) शनिवारचा सामना खेळू शकेल की नाही याचा निर्णय त्याच्या बोटाची अवस्था पाहून सामन्यापूर्वी घेतला जाईल. सध्या तरी त्याच्या हाताला सूज आहे. नेट्समध्ये त्याला फलंदाजी करता येते का, याचा अंदाज घेऊन त्याच्याविषयी निर्णय घेतला जाईल,’ असं हसी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. ‘तो खेळला नाही, तर संघाचं नेतृत्व कोण करेल हे अजून ठरलेलं नाही. पण, संघातील युवा यष्टीरक्षक त्याची जागा घेऊ शकतो,’ असं म्हणत हसी यांनी आपलं वाक्य पूर्ण केलं. (IPL 2025)
यात युवा यष्टीरक्षक म्हणजे धोनी (Mahendra Singh Dhoni) हे चाणाक्ष चाहत्यांना वेगळं सांगायला नको. वयाच्या ४३ व्या वर्षीही धोनीची आयपीएलमधील लोकप्रियता कमी झालेली नाही. आणि घरच्या मैदानावर तो पुन्हा संघाचं नेतृत्व करणार असेल तर ती चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे. धोनीने आतापर्यंत २२६ सामन्यांमध्ये चेन्नईचं नेतृत्व केलं आहे. आणि यात तब्बल ५ वेळा फ्रँचाईजीला लीग विजेतेपद मिळवून दिलं आहे. आताही त्याच्या चपळ यष्टीरक्षणासाठी तो ओळखला जातो. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community