-
ऋजुता लुकतुके
या हंगामात फॉर्मशी झगडणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाला एक टॉनिक मिळालं आहे. ताशी १४५ किमी वेगाने गोलंदाजी करणारा मयंक यादव दुखापतीतून सावरून संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. तो गेले काही महिने बीसीसीआयच्या बंगळुरू येथील क्रिकेट अकादमीत होता. तिथे दुखापतीनंतरच्या पुनर्वसनावर तो काम करत होता. आता त्याला तिथून रजा मिळाली आहे आणि तो संघाबरोबर सरावालाही लागला आहे. अर्थात, संघाच्या पुढील सामन्यात तो खेळेल का, हे अजून स्पष्ट नाही. लखनौचा शनिवारी मुकाबला राजस्थान रॉयल्सशी रंगणार आहे आणि या सामन्यापूर्वी मयंकला तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल. (IPL 2025, Mayank Yadav)
(हेही वाचा – Cyber Security : वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी नागरिकांच्या सेवेत येणार २४ तास ‘डिजिटल रक्षक’)
मयंक ऑक्टोबर २०२४ मध्ये भारताकडून बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखण्यामुळे तो खेळलेला नाही. त्यातच क्रिकेट अकादमीत असताना त्याचा पायाची टाचही दुखावली. त्यामुळे त्याचा तिथला मुक्काम वाढला होता. बीसीसीआयकडून मयंकला क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. पण, लखनौ संघाचे फिजीओ आशिश कौशिकही त्याला तपासणार आहेत. (IPL 2025, Mayank Yadav)
(हेही वाचा – हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही; Raj Thackeray यांची भूमिका)
२२ वर्षीय मयंकला गेल्या २ वर्षांत पाचवेळा विविध प्रकारच्या दुखापती झाल्या होत्या. अगदी गेल्यावर्षीच्या आयपीएल हंगामातही तो फक्त ४ सामने खेळू शकला. त्यानंतर कमरेचा स्नायू दुखावल्यामुळे तो उर्वरित हंगाम खेळू शकला नाही. मयंकला लखनौ फ्रँचाईजीने आपल्याकडे कायम राखलं होतं. पण, हंगामात सुरुवातीचे ६ सामने तो खेळू शकलेला नाही. तो दुखापतगस्त असताना मोहसीन खानही ऐनवेळी दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नाही. संघाकडे आकाशदीप आणि आवेश खान हे दोनच अनुभवी तेज गोलंदाजांचे पर्याय शिल्लक राहिले. अशावेळी फ्रँचाईजीने ऐनवेळी शार्दूल ठाकूरला करारबद्ध केलं. आता मयंक यादव खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (IPL 2025, Mayank Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community