-
ऋजुता लुकतुके
आयपीएलचा मेगा लिलाव २४ आणि १५ नोव्हेंबर या तारखांना सौदी अरेबियात जेद्दाह इथं होणार हे आता स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने लिलावाच्या या तारखा मंगळवारी घोषित केल्या आहेत. लिलावादरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली कसोटी पर्थ इथं सुरू असेल. यंदाच्या लिलावासाठी १,५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यातील १,१६५ भारतीय तर ४०९ परदेशी खेळाडू आहेत. (IPL 2025, Mega Auction)
(हेही वाचा- Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात नेमकं काय?)
भारतीय खेळाडूंपैकी ४८ हे अनुभवी म्हणजे भारतासाठी खेळलेले आहेत. आणि यात नावाजलेली नावं आहेत ती के एल राहुल, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची. यातील राहुल आणि श्रेयस यांना त्यांच्या संघांनी सोडचिठ्ठी दिली आहे. तर रिषभ पंत दिल्लीकडून खेळायला उत्सुक नव्हता. लिलावाविषयी सांगायचं झालं तर सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होत आहे. गेल्यावर्षीचा लिलावही दुबईत झाला होता. (IPL 2025, Mega Auction)
लिलावासाठी नोंदणी झालेल्या खेळाडूंपैकी ३२० खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत. तर १,२२४ खेळाडू हे अननुभवी आहेत. याशिवाय आयसीसीच्या असोसिएट सदस्य देशातील ३० खेळाडूही यंदा लिलावात उतरले आहेत. (IPL 2025, Mega Auction)
We’re coming to Jeddah, the land that’s next to 𝘙𝘦𝘥 𝘚𝘦𝘢,
With a strong vision for our future, you’ll see. 🙌❤️🔥With a maximum of 2️⃣2️⃣ slots left to fill, we are ready to #BidForBold at the #IPLMegaAuction. 🏏🌟
Are you excited, 12th Man Army? 🤩#PlayBold #SaveTheDate… pic.twitter.com/ltOsvRtL65
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 5, 2024
लिलावाच्या आधी झालेल्या खेळाडू कायम ठेवण्याच्या प्रक्रियेत दहाही संघांनी मिळून एकूण ४६ खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. आणि या खेळाडूंवर एकूण ५५८.५ कोटी रुपये संघांचे खर्च झाले आहेत. उर्वरित ६४१.५ कोटी रुपयांची रक्कम लिलावात खर्च करता येणार आहे. लिलावापूर्वी प्रत्येक संघाला खेळाडूंवर खर्च करण्यासाठी १२० कोटी रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती. पण, त्यातलेच पैसे खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी वापरायचे होते. आणि त्यातून शिल्लक राहिलेली रक्कम ही लिलावात वापरता येणार आहे. (IPL 2025, Mega Auction)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईकरांचे लक्ष माहीम, वरळीकडेच! कुणाचा गड येणार, कुणाचा सिंह जाणार?)
राजस्थान रॉयल्सकडे सगळ्यात कमी म्हणजे ४१ कोटी रुपये आता शिल्लक आहेत. तर पंजाब किंग्जनी फक्त दोन खेळाडू आपल्याकडे कायम राखले. आणि ते ही अननुभवी. त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी १११ कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकाता नाईट रायडर्सनी सहा खेळाडू आपल्याकडे कायम राखले. आणि त्यांच्याकडे लिलावात खर्च करण्यासाठी ५१ कोटी रुपये शिल्लक आहेत. (IPL 2025, Mega Auction)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community