-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स संघाचा पहिल्या सामन्यासाठी कर्णधार बदलला. हार्दिकवर एका सामन्याची बंदी असल्यामुळे सूर्यकुमारने संघाचं नेतृत्व केलं. पण, त्यामुळे संघाचं नशीब नाही पालटलं. एकतर गेल्या हंगामापासून सुरू असलेली पराभवांची मालिका थांबली नाही आणि दुसरं म्हणजे दर हंगामाप्रमाणे पहिला सामना गमावण्याचा मुंबई इंडियन्सचा लौकिक संघाने कायम ठेवला. चिदंबरम ची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी होती आणि अशा खेळपट्टीवर चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबईला पहिली फलंदाजी दिली. अश्विन, जडेजा आणि नूर अहमदच्या फिरकीच्या जाळ्यात मुंबईकर फलंदाज अडकले. संघातील सर्वोच्च धावसंख्या तिलक वर्माची ३१ ही होती. बाकी दीपक चहरच्या नाबाद २८ आणि सूर्यकुमार यादवच्या २९ धावा सोडल्या तर एकाही मुंबईच्या फलंदाजाने खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला नाही. सूर्यकुमारला ४४ वर्षीय धोनीने बेमालून यष्टीचित केलं. (IPL 2025, MI vs CSK)
ठरावीक अंतराने बळी जात राहिले आणि त्याचं श्रेय नूर अहमदलाही जातं. त्याने आपल्या ४ षटकांमध्ये फक्त १८ धावा देत ४ बळी मिळवले. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजीला लगाम बसला. आणि संघाच्या फक्त ९ बाद १५५ धावा झाल्या. ही धावसंख्या कमीच होती. त्यातच ऋतुराज गायकवाड आणि रचिल रवींद्र यांनी आव्हान आणखी सोपं केलं. (IPL 2025, MI vs CSK)
(हेही वाचा – Halal : ‘हलाल’ मांस आरोग्याला हानिकारक?)
𝙁𝙞𝙣𝙞𝙨𝙝𝙞𝙣𝙜 𝙬𝙞𝙩𝙝 𝙖 𝘽𝘼𝙉𝙂 💪
Rachin Ravindra takes #CSK to a win over #MI with a brilliant maximum 💛
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/rVjsGQOHyD
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
राहुल त्रिपाठी झटपट बाद झाल्यानंतर ऋतुराज आणि रचिल यांची जोडी जमली आणि दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६७ धावांची भागिदारी केली. सुरुवातीला दोघांमध्ये ऋतुराज जास्त आक्रमक होता. त्याने २६ चेंडूंतच ५३ धावा केल्या त्या ३ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने. ऋतुराजला युवा विघ्नेश पुथुरने बाद केल्यावर चेन्नईची अवस्था काही काळासाठी अवघड बनली होती. कारण, विघ्नेशने पहिल्या तीन षटकांमध्ये प्रत्येकी एक बळी घेत मधली फळी कापून काढली होती. आणि चेन्नईची अवस्था ५ बाद ११६ अशी झाली. पण, त्यानंतर रचिनने खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली आणि विघ्नेशलाच एका षटकांत दोन षटकार मारत सामना परत चेन्नईच्या बाजूने झुकवला. (IPL 2025, MI vs CSK)
मुंबईसाठी हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळले नाहीत. याचाही फटका मुंबईला बसला. १८ धावांत ४ बळी घेणारा नूर अहमद सामनावीर ठरला. आता चेन्नईचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. तर मुंबई २९ तारखेला गुजरात टायटन्सशी झुंजेल. (IPL 2025, MI vs CSK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community