-
ऋजुता लुकतुके
महेंद्रसिंह धोनीने लखनौविरुद्ध चेन्नईला शानदार विजय मिळवून दिला. पण, या सामन्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी अपडेट समोर आली आहे. महेंद्रसिंह धोनीनं लखनौविरुद्ध दमदार फलंदाजी केली. मात्र, या सामन्यात धोनी पायाच्या दुखापतीने त्रस्त असल्याचं दिसून आलं. सामना संपल्यानंतर देखील धोनीला त्रास होत असल्याचं व्हिडिओतून पाहायला मिळालं. धोनीच्या दुखापतीबाबत चेन्नईकडून अधिकृतपणे कळलेलं नाही. पण मुंबईविरुद्ध तो खेळणार का, हा प्रश्न आहे. (IPL 2025, MI vs CSK)
महेंद्रसिंह धोनी लखनौविरुद्ध सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी आला. याखेळीदरम्यान त्याने ११ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या. धोनीनं या खेळीत ४ चौकार आणि एक षटकार मारला. पण, सामन्यानंतर धोनीला चालतानाही त्रास होत होता. यापूर्वीही धोनीला पायाच्या दुखापतीने सतावलं आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना रविवारी होणार आहे. आधीच ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यातच आता धोनीच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. (IPL 2025, MI vs CSK)
(हेही वाचा – Honor Killing Andhra Pradesh : आंध्रप्रदेशात हिंदू युवकाशी लग्न करणाऱ्या मुसलमान मुलीचा संशयास्पद मृत्यू; ऑनर किलिंगचा संशय)
Thala Dhoni limping , Hopefully not a serious one pic.twitter.com/cYfPOpWARG
— Chakri Dhoni (@ChakriDhonii) April 15, 2025
चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी महेंद्रसिंग धोनी संघाचं नेतृत्व करत आहे. त्याच्या जागी चेन्नईनं १७ वर्षीय आयुष म्हात्रेला संघात स्थान दिलं आहे. चेन्नईनं या हंगामात सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. तर, फक्त दोन सामने त्यांनी जिंकले आहेत. ४ गुणांसह चेन्नई सध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. (IPL 2025, MI vs CSK)
यावेळी चेन्नईने सलग पाच सामने गमावले. त्यानंतर शिवम दुबे आणि धोनीच्या जबाबदार फलंदाजीमुळे लखनौविरुद्धचा सामना चेन्नईने जिंकला आहे. पण, बाद फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. (IPL 2025, MI vs CSK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community