- ऋजुता लुकतुके
पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना, मुंबई इंडियन्सनी घरच्या मैदानावर एकही चूक केली नाही. नाणेफेकीपासून सगळं त्यांच्या मनासारखं घडलं. महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे महत्त्वाचे फलंदाज तळपले. त्यामुळे चेन्नईचं १७७ धावांचं आव्हान त्यांनी तब्बल २६ चेंडू राखून आणि ९ गडी हातात ठेवूनच पार केलं. एकूणच सामन्यावर फंलदाजांचं वर्चस्व होतं. रात्री कृत्रिम प्रकाशात रोहित आणि सूर्याची बॅट चांगलीच तळपली. रोहितचा सलामीचा साथीदार रायन रिकलटननेही (Ryan Rickelton) १९ चेंडूंत २४ धावा करत रोहितबरोबर ६२ धावांची अर्धशतकी सलामी मुंबईला करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार आणि रोहितच्या झंजावाताने चेन्नईला झाकोळून टाकलं. दोघांनी ५२ चेंडूंत १०७ धावांची नाबाद भागिदारी केली. (IPL 2025, MI vs CSK)
रिकलटन (Ryan Rickelton) सीमारेषेवर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रोहित यांनी खेळाची सूत्र पूर्णपणे आपल्याकडे घेतली. रोहित खासकरून मनाला येईल तसे षटकार मारत होता. दोघांसमोर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि अश्विन या दिग्गज फिरकीपटूंचाही टिकाव लागला नाही. या हंगामात आतापर्यंत खेळ बहरण्यापूर्वीच चुकीचा फटका खेळून बाद होणाऱ्या रोहितने या सामन्यात शेवटपर्यंत फलंदाजी केली. ४५ चेंडूंत ७६ धावा करताना त्याने ६ षटकार आणि ४ चौकार ठोकले. तर सूर्यकुमारने ६३ धावा करत त्याला साथ दिली. दोघं मैदानात असताना मुंबईला धावगतीचंही दडपण नव्हतं.
(हेही वाचा – National Herald Case : सोनिया, राहुलच नव्हे, जवाहरलाल नेहरूही होते घोटाळेबाज)
The mighty Mumbai Indians are on the charge !!! What a win – simply blew away CSK !!
Rohit Sharma: 76*
Suryakumar Yadav: 68*#MIvsCSK #CSKvsMI pic.twitter.com/ByL3xojbLl— Cricketism (@MidnightMusinng) April 20, 2025
रोहितच्या साथीने सूर्याचाही खेळ बहरला. त्याने ३० चेंडूंत ६८ धावा केल्या. जम बसल्यावर दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरश: कत्तल केली. त्यापूर्वी चेन्नईने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या त्या रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) नाबाद ५३ आणि शिवम दुबेच्या (Shivam Dubey) ५० धावांच्या जोरावर. एरवी ठरावीक टप्प्याने त्यांचे फलंदाज बाद झाल्याने मधल्या फळीवरील दडपण वाढलं होतं. दोघांखेरीज युवा मुंबईकर आयुष म्हात्रेनं (Ayush Mhatre) ३२ धावा केल्या. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने या डावांत एकूण ७ गोलंदाज वापरले. पैकी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) २५ धावांत २ बळी घेऊन सर्वाधिक यशस्वी ठरला. (IPL 2025, MI vs CSK)
चेन्नईचा हा सलग सहावा पराभव ठरला आहे. तर मुंबई मधल्या दोन पराभवांनंतर घरच्या मैदानावर सावरलेली दिसत आहे. चेन्नई फक्त एका विजयासह आता गुण तालिकेत तळाला आहे. तर मुंबईचा संघ तगड्या विजयासह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. नाबाद ७६ धावांच्या खेळीसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) सामनावीर पुरस्कार मिळाला. (IPL 2025, MI vs CSK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community