-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यानच्या सामन्यात एक यादगार क्षण रसिकांना अनुभवायला मिळाला. काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. महेंद्रसिंग धोनीने ४३ व्या वर्षी वय हा फक्त आकडा आहे, वयाचा कामगिरीशी काहीही संबंध नाही हेच जणू दाखवून दिलं. मुंबई इंडियन्स संघाचा डाव सुरू असताना अकराव्या षटकांत सूर्यकुमार यादव फलंदाजीला होता. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नूर अहमद या नवख्या गोलंदाजासमोर धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सूर्यकुमार करणार होता. त्या प्रयत्नांत त्याने क्रीझ सोडली आणि तो काही इंच पुढे गेला. पण, चेंडू बॅटला लागला नाही आणि पुढे काही कळायच्या आत धोनीने चेंडू झेलून सूर्यकुमारच्या यष्ट्या उखडलेल्या होत्या. काय झालंय हे न कळून काही काळ सगळे स्तब्ध झाले होते. (IPL 2025, MI vs CSK)
सूर्यकुमारचा फटका खेळून पूर्णही झाला नव्हता आणि बॅट पूर्णपणे खालीही आली नव्हती, तोपर्यंत धोनीने चेंडू अडवून आपलं काम फत्ते केलं होतं. भारतीय संघासाठी खेळत असताना धोनी आपल्या याच चपळाईसाठी प्रसिद्ध होता. पण, आता ४३व्या वर्षी त्याच्याकडून अशा खेळ बघायला मिळाल्यावर तरुणांसाठी हे एक उदाहरणच आहे. (IPL 2025, MI vs CSK)
(हेही वाचा – Kunal Kamra याच्यावर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळात ग्वाही)
🚄: I am fast
✈: I am faster
MSD: Hold my gloves 😎Nostalgia alert as a young #MSDhoni flashes the bails off to send #SuryakumarYadav packing!
FACT: MSD affected the stumping in 0.12 secs! 😮💨
Watch LIVE action: https://t.co/uN7zJIUsn1 #IPLonJioStar 👉 #CSKvMI, LIVE NOW on… pic.twitter.com/oRzRt3XUvC
— Star Sports (@StarSportsIndia) March 23, 2025
सूर्यकुमार २९ धावा करून बाद झाला आणि मुंबई इंडियन्सच्या डावालाही त्यामुळे ब्रेक लागला. धोनीची यष्टीमागील समयसूचकता, चपळता आणि हातोटीही पुन्हा एकदा समोर आली. शिवाय नूर अहमदला आयपीएलमधील हा पहिली बळी मिळाला. त्यानंतर नूरने ४ षटकांत फक्त १८ धावा देत ४ बळी मिळवले. चेन्नईच्या फिरकीपटूंनी मुंबईला वेळोवेळी रोखल्यामुळे मुंबईला निर्धारित २० षटकांत फक्त ९ बाद १५५ धावा करता आल्या. तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर तळाला येऊन दीपक चहरने १५ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्स निदान दीडशेचा टप्पा गाठू शकली. (IPL 2025, MI vs CSK)
ही धावसंख्या चेन्नईने एक षटक राखून आरामात पूर्ण केली. रचिल रवींद्रने नाबाद ६६ धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईची फलंदाजी असताना संघाला विजयासाठी फक्त ४ धावा हव्या होत्या आणि रवींद्रनेच षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला. पण, रवींद्र जडेजाचा बळी गेल्यानंतर मैदानावर प्रचंड जल्लोष साजरा झाला. कारण, त्यानंतर धोनी मैदानात उतरणार होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसतानाही आणि फलंदाजीला पुरेसा वाव नसतानाही फक्त मैदानात धोनीचं दर्शन झालं म्हणून हा जल्लोष झाला. त्यावरून धोनीची लोकप्रियता कळते. (IPL 2025, MI vs CSK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community